राजस्थान रॉयल्स संघाचे क्रिकेट संचालक कुमार संगकारा याच्या मते वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरची अनुपस्थिती त्यांच्या संघासाठी खूप मोठा धक्का आहे. परंतु भारतीय युवा वेगवान गोलंदाज या संधीचे सोने नक्कीच करू शकतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.
आज (12 एप्रिल) रोजी पंजाब किंग्ज विरुद्ध होणाऱ्या सामन्याआधी संगकाराने म्हटले आहे की, “कर्णधार संजू सॅमसन आणि माझ्यासाठी, वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरची अनुपस्थिती ही संघासाठी एक मोठा धक्का आहे. कारण जोफ्रा हा आमच्या संघाचा एक महत्त्वाचा भाग आहे. परंतु तो सध्या आमच्या संघात नाही हे आमच्यासाठी दुर्दैवी आहे. त्यामुळे त्याची अनुपस्थिती लक्षात घेऊन आम्हाला नियोजन करावे लागणार आहे.”
परंतु नंतरच्या काही सामन्यांमध्ये हा वेगवान गोलंदाज संघात उपलब्ध राहून आयपीएल 2021 मध्ये आपली कामगिरी पार पाडणार असल्याची संगकाराने अपेक्षा बाळगली आहे. गेल्या काही वर्षांपासून राजस्थान संघाची वेगवान गोलंदाजी कमकुवत राहिली आहे. तसेच त्यांचा सर्वात अनुभवी गोलंदाज जयदेव उनाडकटही चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे. तसेच उनाडकटशिवाय चेतन सकारीया आणि कार्तिक त्यागी हे डावखुरे गोलंदाज राजस्थान संघात पर्याय म्हणून आहेत.
आयपीएलच्या मागील अनेक मोसमात खेळलेल्या संगकाराने म्हटले आहे की, “कदाचित अनुभव नसलेल्या खेळाडूंचाही संघाला फायदा होऊ शकतो. कारण विरोधी संघाला या खेळाडूंबद्दल फारसे काही माहिती नसते. तसेच आयपीएलमध्ये वेगवान गोलंदाजी करणेही सोपे काम नाही. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्या सामन्यात हे आपण पाहिले आहे.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “बहुतेक खेळपट्ट्या या फलंदाजीसाठी चांगल्या असतात. त्यामुळे अशा परिस्थितीत आपल्याकडे कौशल्य असणे गरजेचे आहे. मागील मोसमात चांगली कामगिरी करणारा कार्तिक त्यागी सध्या आमच्याकडे असून त्याचबरोबर कुलदीप यादव आणि चेतन साकारिया हे वेगवान गोलंदाज देखील यावर्षी आमच्या संघात आहेत.”
तसेच संगकारा म्हणाला की, “संजू सॅमसन असो किंवा राहुल तेवतिया. परंतु दबाब हा नेहमीच असतो. परंतु आपल्याकडून नेहमीच चांगली खेळी करण्याच्या अपेक्षा असतात. त्यामुळे तुम्हाला त्या दडपणाचा सामना करावा लागणार हे खरे आहे. आणि त्या दडपणाला सामोरे जाण्याचा प्रत्येकाकडे काही ना काही मार्ग असतोच.”
महत्त्वाच्या बातम्या-
भिडू नंबर १! अर्धशतक केल्यानंतर नितीश राणाचे अनोखे सेलिब्रेशन, पण कोणासाठी? ऐका त्याच्याच तोंडून