मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील रोमांचक लढत चाहत्यांना रविवारी (30 एप्रिल) अनुभवता आली. राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना 212 अशी मोठी धावसंख्या उभी केली. प्रत्युत्तरात मुंबईच्या फलंदाजांनीही तितक्याच आक्रमकपणे तीन चेंडू राखून धावांचा पाठलाग केला. मुंबईचा हा स्पर्धेतील चौथा विजय ठरला. मात्र, या सामन्यात राजस्थानचा युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल याने शानदार शतक झळकावले होते. यानंतर त्याचे कौतुक करताना राजस्थानचा मुख्य प्रशिक्षक कुमार संघकारा याने त्याला भारताचे भविष्य म्हटले.
यशस्वी जयस्वाल याने या सामन्यात 62 चेंडूवर 16 चौकार व 8 षटकारांच्या मदतीने 124 धावा केल्या. तसेच तो या हंगामात राजस्थानसाठी सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज देखील ठरला आहे. त्यानंतर त्याचे कौतुक करताना संगकारा म्हणाला,
“यशस्वी नक्कीच भारतीय संघाचे भविष्य आहे. तो फक्त कौशल्य असलेला खेळाडू आहे असे नव्हेतर, त्यासाठी त्याने तितकी मेहनत केली आहे. तो गोष्टी खूप लवकर शिकतो. मी त्याला मागील तीन-चार वर्षांपासून पाहतोय. तो सरावा वेळी अत्यंत एकाग्रतेने गोष्टी करतो.” यशस्वी 2020 पासून राजस्थान रॉयल्सचा भाग आहे.
या सामन्याचा विचार केल्यास राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. राजस्थान संघासाठी या सामन्यात केवळ सलामीवीर यशस्वी जयस्वाल हाच झुंज देऊ शकला. आपल्या घरच्याच मैदानावर खेळत असलेल्या यशस्वी याने 62 चेंडूवर 124 धावांची खेळी केली. या धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची सुरुवात खराब झाली होती. मात्र, सूर्यकुमार यादवने वादळी अर्धशतक झळकावत संघाला विजयाच्या दिशेने नेले. अखेरीस टीम डेविड याने 14 चेंडूवर नाबाद 45 धावा करून संघाला विजय मिळवून दिला.
(Rajasthan Royals Head Coach Kumar Sangakkara Said Yashasvi Jaiswal Is India Future)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: युवा नवीनने घेतला विराटशी पंगा, शाब्दिक चकमकीनंतर झटकला हात
सामना संपल्यानंतर विराट आणि गंभीरमध्ये राडा! आयपीएलमध्ये दुसऱ्यांदा भिडले दिग्गज