आयपीएल 2025च्या 28व्या सामन्यात राजस्थान राॅयल्स आणि राॅयल चॅलेंजर्स बंगळुरु आमने सामने होते. हा सामना आरसीबीने एकतर्फी जिंकला. संघाने 9 विकेट्स आणि 15 चेंडूने राखून जिंकला. या सामन्यात विराटने नाबाद 62 धावांची खेळी खेळली.
पहिल्या डावात खेळताना राजस्थान राॅयल्सने मर्यादित 20 षटकात 174 धावा केल्या. ज्याचा पाठलाग करताना आरसीबीसाठी विराट कोहली आणि फील साॅल्टने शानदार सुरवात केली. दोघांनी मिळून 92 धावांची शानदार भागीदारी रचली. ज्यात विराटने विश्वसनीय खेळी खेळली. त्याने 45 चेंडूत 62 धावा केल्या. या अर्धशतकी खेळीसह त्याने टी20 क्रिकेटमध्ये 100 वेळा 50+ धावांचा टप्पा पार केला आहे.
याशिवाय साॅल्टने 33 चेंडूत 65 धावांची तुफानी पारी खेळली. त्या दरम्यान त्याने 5 चौकार आणि 6 षटकार झळकावले.
फिल साल्ट बाद झाल्यानंतर विराट कोहलीने देवदत्त पडिकल सोबत 83 धावांची भागीदारी रचली. त्यानंतर बंगळुरूने शानदार विजय मिळवला. एकीकडे विराटने 62 धावा, तसेच पडिकलने 28 चेंडूत 40 धावा करत महत्वपूर्ण भूमिका निभावली. राजस्थानकडून 7 गोलंदाजांनी गोलंदाजी केली, पण त्यामध्ये फक्त कुमार कार्तिकेयने फक्त एक विकेट घेतली.
Padikkal powers up! 💪🏻❤️#RCB were in cruise mode as they registered a ROYAL finish! 👑
— Star Sports (@StarSportsIndia) April 13, 2025
Up NEXT on #IPLonJioStar 👉 DC 🆚 MI | LIVE NOW on Star Sports Network & JioHotstar!
Watch LIVE action ➡ https://t.co/QAuja88phU pic.twitter.com/1rwvvoGaD1