इंडियन प्रीमियर लीग फ्रँचायझी लखनऊ सुपर जायंट्सने ऍंडी फ्लॉवर यांची नुकतीच साथ सोडली. फ्लॉवर लखनऊ सुपर जायंट्ससाठी मागच्या दोन्ही आयपीएल हंगामात मुख्या प्रशिक्षकाची भूमिका पार पाडत होते. त्यांनी दोन्ही हंगामांमध्ये संघाला प्लेऑफसाठी पात्र केले. पण तरीही शुक्रवारी (14 जुलै) संघाने त्यांना करारातून मुक्त केले. त्यानंतर आता फ्लॉवर पुन्हा एकदा आयपीएलमध्ये दिसू शकतात.
लीग क्रिकेटमधील मान्यवर प्रशिक्षकांपैकी एक असलेले फ्लॉवर आयपीएल 2021 मध्ये लखनऊ सुपर जायंट्ससोबत जोडले जाण्याआधी पंजाब किंग्स संघाचा भाग होते. पंजाबसाठी त्यांनी दोन आयपीएल हंगामात सहायक प्रशिक्षक म्हणून कामकाज पाहिलेले. 2021 मध्ये लखनऊसोबत जोडले गेल्यानंतर त्यांनी आयपीएल 2022 आणि 2023 हंगामात संघाला सलग दोन वेळा तिसरे स्थान मिळवून देण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली. त्यानंतरही लखनऊ संघाने त्यांच्याशी फारकत घेतली. त्यांच्या जागी ऑस्ट्रेलियाचे जस्टिन लँगर लखनऊ संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका बजावतील.
लखनऊ संघापासून वेगळे झाल्यानंतर अवघ्या चारच दिवसानंतर फ्लॉवर हे पुन्हा एकदा आयपीएलमध्ये अन्य संघासाठी मार्गदर्शन करताना दिसण्याची शक्यता आहे. एका आघाडीच्या क्रीडा संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, फ्लॉवर हे पहिल्या आयपीएलचे विजेते राजस्थान रॉयल्सशी मुख्य प्रशिक्षकपदासाठी चर्चा करत आहेत. ही चर्चा अंतिम टप्प्यात असून ते मुख्य प्रशिक्षक बनण्याची दाट शक्यता आहे.
राजस्थान रॉयल्स मागील तीन हंगामापासून मुख्य प्रशिक्षकाविना आयपीएलमध्ये सहभागी होतोय. राजस्थान रॉयल्सचे क्रिकेटिंग हेड म्हणून श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा काम पाहतो. पुढील हंगामात देखील तो या पदावर कायम राहणार असल्याचे राजस्थान रॉयल्सने स्पष्ट केले आहे. त्यामुळे संगकारा व फ्लॉवर ही जोडी राजस्थानला दुसरे विजेतेपद मिळवून देण्यासाठी प्रयत्न करताना दिसेल.
(Rajasthan Royals In Talk With Andy Flower For Head Coach)
महत्वाच्या बातम्या –
“त्याने पाणीपुरी विकलीच नाही”, यशस्वीच्या प्रशिक्षकांचा खळबळजनक दावा, म्हणाले, “तो माझ्यामूळे…”
देशासाठी तीन विश्वचषक जिंकणाऱ्या धोनीवर माजी कर्णधाराचा निशाणा; म्हणाले, ‘कर्णधार तोच राहणार…’