राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात दिल्ली येथे रविवारी (०२ मे) आयपीएल २०२१ चा २८ वा सामना झाला. या चुरशीच्या सामन्यात इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलर याने पैसावसूल प्रदर्शन केले. सलामीला फलंदाजीला येत या ३० वर्षीय फलंदाजाने झुंजार शतक झळकावले. हे त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील पहिलेवहिले शतक ठरले आहे. शतक करत त्याने मोठ्या विक्रमांची आपल्या खात्यात नोंद केली आहे.
पहिल्या षटकापासून आक्रमक पवित्रा घेत बटलरने चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. सलामीवीर यशस्वी जयस्वाल बाद झाल्यानंतर कर्णधार संजू सॅमसनने त्याला पुरेपुर साथ दिली. त्यामुळे ५६ चेंडूत १० चौकार आणि आणि ६ षटकार ठोकत या धुरंधरने त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील पहिले शतक केले.
यासह बटलर आयपीएलच्या इतिहासात शतक झळकावणारा तो केवळ चौथा इंग्लंडचा क्रिकेटपटू ठरला आहे. बटलरपुर्वी जॉनी बेयरस्टो, बेन स्टोक्स आणि केविन पीटरसन या इंग्लिश क्रिकेटपटूंनी आयपीएलमध्ये शतक झळकावले आहे. त्यातही स्टोक्सने एक नव्हे तर २ शतके केली आहेत.
आयपीएलमध्ये शतक करणारे इंग्लंडचे क्रिकेटपटू
केविन पीटरसन
बेन स्टोक्स (२ शतके)
जॉनी बेयरस्टो
जोस बटलर
अखेर ६४ चेंडूत १२४ धावा चोपत बटलर पव्हेलियनला परतला. १८.६ षटकात संदीप शर्माने त्याला त्रिफळाचीत केले. परंतु त्याच्या या धुव्वादार खेळीच्या जोरावर राजस्थान संघ २० षटकअखेर २२० धावांचा डोंगर उभारु शकला.
महत्त्वाच्या बातम्या-
RR vs SRH Live: जोस बटलरचा शतकी तडाखा! राजस्थानचे हैदराबादसमोर विजयासाठी २२१ धावांचे मोठे आव्हान
कर्णधारपदावरुन काढून टाकण्यापूर्वी वॉर्नर झाला होता भावूक? हा व्हिडिओ शेअर काढली चाहत्यांची आठवण
एमएस धोनीशी तुलना केली जाणाऱ्या ‘या’ पठ्ठ्याचे झाले आयपीएल पदार्पण, जाणून घ्या त्याच्याबद्दल