मुंबई । राजस्थान रॉयल्स संघाने स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यात चांगली कामगिरी केली आहे. कोलकाता विरुद्धच्या सामन्यात राजस्थान संघ पराभूत झाला आहे, पण त्याआधी फलंदाजांनी दणदणीत प्रदर्शन केले होते. संघाला अद्याप स्टार अष्टपैलू बेन स्टोक्सची कमतरता जाणवत आहे. संघाचा मार्गदर्शक शेन वॉर्नने या स्पर्धेत त्याच्या खेळण्याविषयी एक महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.
वॉर्नने पीटीआयला सांगितले की, अष्टपैलू बेन स्टोक्स लवकरात लवकर संघात यावे अशी त्यांची इच्छा आहे. वडिलांच्या आजारपणामुळे तो आतापर्यंत स्पर्धेत खेळू शकलेला नाही. तो म्हणाला, “मला आशा आहे की, बेन स्टोक्स यावर्षीच्या स्पर्धेत भाग घेईल. त्याचे संघात नसणे आमच्यासाठी एक मोठा तोटा आहे. आमचे विचार नेहमी त्याच्यासोबत असतील. पण आपल्याला माहित आहे की, आमच्याकडे जो संघ आहे त्यात जर बेन स्टोक्स असला असता, तर खूप छान झाले असते.”
स्टोक्स सध्या न्यूझीलंडमध्ये कुटुंबासमवेत आहे. यावर्षी ऑगस्टमध्ये वडिलांच्या मेंदूच्या कर्करोगावर उपचार सुरू असताना तो तेथे गेला होता. याच कारणास्तव तो पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये संघाचा भाग नव्हता. वैयक्तिक कारणे सांगून त्याने सामन्यातून माघार घेतली होती.
राजस्थान रॉयल्सच्या महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक स्टोक्स आहे. तो पुढे म्हणाला की, “बेन स्टोक्स संघात आला तर, जोस बटलर, स्टीव्ह स्मिथ आणि संजू सॅमसन यांच्यासह संघाची फलंदाजी फळी आणखी बळकट होईल.”
स्मिथने मागील दोन सामन्यांत 69 आणि 50 धावा केल्या आहेत. यावर वॉर्न म्हणाला, “मला ते आवडले, तो डावाची सुरवात करण्यासाठी आला होता. मी नेहमीच त्याच्या बाजूने आहे, जो चांगला खेळाडू असेल त्याला जास्तीत जास्त चेंडू खेळण्याची संधी मिळायला हवी. त्यामुळे मला वाटते की जोस बटलर, स्टीव्ह स्मिथ आणि संजू सॅमसन पहिल्या, दुसर्या आणि तिसर्या क्रमांकावर फलंदाजीस यायला हवे.”