इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या १५ व्या हंगामातील १३ वा सामना राजस्थान राॅयल्स आणि राॅयल्स चॅलेंजर्स बेंगलोर या दोन संघांमध्ये खेळला गेला. हा सामना आरसीबीने ३ विकेट्सने जिंकला. यानंतर राजस्थानला संघाला मोठा धक्का बसला आहे, याचे कारण म्हणजे राजस्थानचा वेगवान गोलंदाज नॅथन कूल्टर-नाईल हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे संपूर्ण हंगामातून बाहेर झाला आहे.
नाईलचे संघातून बाहेर होणे, हा संजू सॅमसनसाठी मोठा झटका मानला जात आहे. कारण तो फक्त गोलंदाजीच्या ४ षटकांतच नाही, तर फलंदाजीत देखाील खालच्या क्रमांकावर मोठे शाॅट मारण्याची क्षमता ठेवतो.
राजस्थान फ्रॅंचायझीने कुल्टर-नाईलच्या बदली खेळाडूची घोषणा केली नाही. त्यामुळे आता चाहत्यांच्या नजरा राजस्थानच्या बदली खेळाडूबाबतच्या घोषणेकडे असणार आहेत. फेब्रुवारीमध्ये पार पडलेल्या आयपीएलच्या मेगा लिलावात राजस्थानने त्याला २ कोटींना विकत घेतले होते. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थानने १५ व्या आयपीएल हंगामाची शानदार सुरुवात केली आहे.
पहिला सामन्यात राजस्थानने सनरायझर्स हैदराबादला ६१ धावांनी पराभूत केले, तर दुसऱ्या सामन्यात संघाने मुंबईला २१ धावांनी पराभूत केले. संघाचा आरसीबीविरुद्ध पहिलाच पराभव आहे. राजस्थान संघ सध्या गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. या हंगामात राजस्थानची गोलंदाजी बरोबरच फलंदाजी देखील मजबूत आहे. राजस्थान राॅयल्सकडून जाॅस बटलरने धमाकेदार खेळी केली आहे. देवदत्त पडिकल आणि संजू सॅमसन देखील उत्तम फलंदाजी करताना दिसत आहेत. गोलंदाजीत ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, रविचंद्रन अश्विन आणि युजवेंद्र चहल यांनी सुद्धा शानदार गोलंदाजी केली आहे.
कुल्टर-नाइल हा ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज असून त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीत ३९ सामन्यांत २२.९२ च्या सरासरीने ४८ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने ३२ एकदिवसीय सामन्यात ५२ विकेट्स घेतल्या आहेत, तर २८ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांत ३४ विकेट्स घेतल्या आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
विनिंग शॉट! आरसीबीच्या विजयावर शिक्कामोर्तब करणाऱ्या हर्षल पटेलच्या खणखणीत षटकाराचा Video व्हायरल
‘सामना कधी हातातून निसटला कळलंच नाही’, आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर सॅमसनची कबुली