इंग्लंडच्या वनडे व टी20 संघाचा कर्णधार जोस बटलर हा आपल्या आक्रमक क्रिकेट खेळण्याच्या अंदाजासाठी ओळखला जातो. त्यामुळे जगभरातील टी20 लीगमध्ये त्याला मोठी मागणी असते. आयपीएलमध्ये तो राजस्थान रॉयल्स संघाचा भाग आहे. राजस्थानच्या इतर देशातील लीगमध्ये देखील फ्रॅंचाईजी दिसतात. त्यासाठी आता रॉयल्स आता चार वर्षासाठी बटलरला आपल्या विविध संघांत खेळवू इच्छितो. यासाठी कोट्यावधी रुपयांची ऑफर त्याला देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
बसलं इंग्लंडचा मर्यादित षटकांच्या संघाचा सर्वात महत्त्वपूर्ण सदस्य असून, तो संघाचे नेतृत्व देखील करतो. मागील तीन वर्षांपासून त्याने कोणताही कसोटी सामना खेळलेला नाही. यासोबत तो आयपीएलसह दक्षिण आफ्रिकेत एसए टी20 लीगमध्ये पार्ल रॉयल्स संघासाठी खेळत असतो. राजस्थानची कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये बार्बाडोस रॉयल्स या नावाने फ्रॅंचाईजी आहे. बटलर या संघासाठी देखील खेळावा अशी अपेक्षा रॉयल्स व्यवस्थापनाची आहे.
माध्यमातील वृत्तानुसार, रॉयल्स व्यवस्थापनाने बटलरला आपल्या तिन्ही संघांसाठी खेळण्यासाठी मोठी ऑफर दिलेली आहे. ते बटलरला चार वर्षासाठी करारबद्ध करू इच्छितात. त्याने या प्रस्तावाला होकार दिल्यास त्याला इंग्लंड संघासोबत असलेला केंद्रीय करार सोडावा लागेल. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी त्याला प्रत्येक वेळी रॉयल्सची परवानगी घ्यावी लागेल.
काही दिवसांपूर्वी मुंबई इंडियन्सने जोफ्रा आर्चरला अशी ऑफर दिल्याचे सांगण्यात येत होते. तसेच केकेआरकडून आंद्रे रसेल व जेसन रॉय यांना अशीच ऑफर दिल्याचे सांगण्यात आलेले. मात्र, या तिघांनी देखील याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती.
(Rajasthan Royals Offer Millions For 4 Years To Jos Buttler If He Accept He Excludes From Central Contract)
महत्वाच्या बातम्या
आज मिळणार MPL चा महाविजेता! रत्नागिरी-कोल्हापूर अंतिम सामन्यात झुंजणार