आयपीएल 2023 स्पर्धेचा 11वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात खेळला गेला. गुवाहाटी येथील बारसपारा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात फलंदाजांनी मोठ्या धावसंख्या रचल्या. त्याचवेळी आपल्या घरच्या मैदानावर खेळत असलेल्या राजस्थानच्या रियान पराग याला आपली छाप सोडण्यात अपयश आले. आपल्या आयपीएल कारकिर्दीतील पन्नासावा सामना खेळत असलेला रियानची कारकीर्द आत्तापर्यंत कशी राहिले आहे हे आपण पाहूया.
भारतीय संघाने 2018 अंडर 19 क्रिकेट विश्वचषक जिंकल्यानंतर पराग याला राजस्थानने आपल्या संघात सामील करून घेतले होते. 2019 पासून तो राजस्थान संघाचा भाग आहे. विशेष म्हणजे राजस्थानने त्याला वेळोवेळी संधी देत त्याला पाठिंबा देखील दिला. मात्र, या संधीचे सोने करण्यात तो अपयशी ठरल्याचे दिसून येते.
गुवाहाटी येथील आपल्या घरच्या मैदानावर 50 वा आयपीएल सामना खेळण्याची संधी त्याला मिळाली होती. मात्र, या सामन्यात तो केवळ 7 धावा करू शकला.
उजव्या हाताने आक्रमक फलंदाजी तसेच ऑफस्पिन गोलंदाजी पराग करतो. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये पन्नास सामन्यांच्या 40 डावांत 16.35 च्या सरासरीने व 124 च्या स्ट्राईक रेटने केवळ 565 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून केवळ दोन अर्धशतके आलीत. त्यामुळे त्याची कारकीर्द आत्तापर्यंत तरी अपयशीच असल्याचे दिसून येते.
पराग हा आयपीएल मध्ये खेळणारा आसामच एकमेव क्रिकेटपटू आहे. आयपीएल 2023 आधी तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगलाच चमकला होता. आयपीएल सुरू होण्यापूर्वी त्याने आपण या हंगामात एकदा तरी एका षटकात चार षटकार लगावणार असल्याचे म्हटलेले. मात्र, पहिल्या तीन सामन्यात त्याला मोठी खेळी करण्यात अपयश आले आहे.
(Rajasthan Royals Riyan Parag Stats In IPL)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नवख्या जयसवालचा गुवाहाटीत धमाका! पहिल्याच ओव्हरमध्ये केली ‘अशी’ कामगिरी, थेट गेल-वॉर्नरच्या यादीत नाव
विमानात ब्लॉग करायला निघालेल्या चाहरला धोनीने दिलं हाकलून? दोनदा झाली ‘हटाई’, पाहा व्हिडिओ