---Advertisement---

PBKS vs RR: राजस्थान संघाने पंजाब किंग्सला जिंकण्यासाठी दिलं 206 धावांचं आव्हान

---Advertisement---

आयपीएल 2025 स्पर्धेतील अठरावा सामना आज राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स दोन्ही संघात खेळला जात आहे. हा सामना महाराजा यादविंन्द्र सिंग इंटरनॅशनल स्टेडियम वर खेळला जात आहे. पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच राजस्थान रॉयलला फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. राजस्थाननी प्रथम फलंदाजी करताना धावा 205 केल्या आणि आता पंजाबला जिंकण्यासाठी 206 धावांचं आव्हान दिलं आहे.

राजस्थानसाठी प्रथम फलंदाजी करताना सर्वाधिक धावा यशस्वी जयस्वालने केल्या त्याने 45 चेंडूत 67 धावा केल्या. त्यामध्ये त्याने चौकार व 5 षटकार झळकावले. कर्णधार संजू सॅमसनने 26 चेंडूत 38 धावा केल्या. तसेच रियान परागने 25 चेंडूत 43 धावा केल्या. त्याने तीन चौकार व तीन षटकार झळकावले.

पंजाबसाठी गोलंदाजी करताना लकी फर्ग्युसनने 2 विकेट घेतल्या. त्याने यशस्वी जयस्वाल व संजू सॅमसन यांना बाद केले. तसेच अर्शदिप सिंग व मार्को यान्सनने एक एक विकेट्स घेतल्या.

आता पंजाब किंग्स संघ किती षटकात हे आव्हान पूर्ण करू शकेल हे पाहणं रंजकतेचे असणार आहे. पंजाबने या हंगामात आतापर्यंत दोन विजय मिळवले आहेत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---