आयपीएल 2023 चा आठवा सामना राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला जाईल. बुधवारी (5 एप्रिल) सायंकाळी 7.30 वाजता हा सामना गुवाहाटी येथे सुरू होईल. दोन्ही संघांनी हंगामातील आपला पहिला सामना जिंकला आहे. अशात सलग दुसऱ्या विजयासाठी दोन्ही संघ प्रयत्न करतील. त्याचवेळी पंजाब किंग्सला राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन यांच्यापासून चांगलेच सावध राहावे लागेल. कारण संजूची पंजाबविरुद्धची आत्तापर्यंतची आकडेवारी तसेच दाखवत आहे.
आयपीएल इतिहासातील टॉप टेन भारतीय फलंदाजांमध्ये असलेला संजू हा मागील 10 वर्षांपासून आयपीएल खेळतोय. तसेच मागील तीन हंगामापासून त्याच्याकडे राजस्थानचे नेतृत्व देखील आहे. त्याच्या नेतृत्वात मागील वर्षी राजस्थानने अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास केला होता. एक फलंदाज म्हणून देखील तो नेहमीच संघाचा आधारस्तंभ राहिला आहे.
संजू आयपीएलमध्ये आतापर्यंत सर्वाधिक यशस्वी पंजाबविरुद्धच ठरलाय. त्याने पंजाबविरुद्ध आतापर्यंत 19 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून तब्बल 658 धावा निघालेल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी 41.13 अशी दमदार राहिलीये. तर स्ट्राइक रेटही 143 पेक्षा जास्त आहे. यादरम्यान त्याच्या बॅटमधून एक शतकही आलेय. त्यामुळे या सामन्यात पंजाबला जोस बटलर व यशस्वी जयस्वाल या सलामी जोडीपेक्षा सॅमसनकडून अधिक धोका असेल.
उभय संघांतील हा सामना गुवाहाटीच्या बरसापारा स्टेडियमवर खेळला जाईल. या स्टेडियमला राजस्थान रॉयल्सचे दुसरे होम ग्राउंड म्हणून घोषित करण्यात आले आहे. राजस्थानने आपल्या पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 72 धावांनी एकतर्फी विजय मिळवला होता. तर दुसरीकडे पंजाब किंग्जने कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध डकवर्थ लुईस नियमानुसार 7 धावांनी विजय साजरा केलेला.
राजस्थान रॉयल्स संभाव्य 11: यशस्वी जयसवाल, जोस बटलर, देवदत्त पडिकल, संजू सॅमसन (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, रियान पराग, जेसन होल्डर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, केएम आसिफ, युजवेंद्र चहल.
(Rajasthan Royals Skipper Sanju Samson Impressive Stats Against Punjab Kings In IPL)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पंच नितीन मेननचं स्वप्न खरं होणार! पहिल्यांदाच करणार ‘या’ महत्वाच्या मालिकेत अंपायरिंग
दुखापतग्रस्त राज बावाच्या जागी पंजाब किंग्जमध्ये दमदार खेळाडूची एन्ट्री, फ्रँचायझीने मोजली एवढी किंमत