fbpx
Sunday, January 24, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

न्यूझीलंडच्या दिग्गज खेळाडूने केली भविष्यवाणी; हा संघ राहणार आयपीएलमध्ये गुणतालिकेत सर्वात शेवटी

September 17, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0
Photo Courtesy: Twitter/ rajasthanroyals

Photo Courtesy: Twitter/ rajasthanroyals


मुंबई । कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ‘बायो सेफ’ वातावरणात इंडियन प्रीमियर लीग 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये सुरू होणार आहे. 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत खेळल्या जाणार्‍या या स्पर्धेचे जगभरातील क्रीडाप्रेमींच्या नजरा लागून राहिल्या आहेत. प्रत्येकजण 13 व्या हंगामाच्या विजेत्याचा अंदाज वर्तवित आहे. न्यूझीलंडचा माजी खेळाडू स्कॉट स्टायरिस यांनीही अशीच भविष्यवाणी केली आहे, परंतु त्यांनी वर्तवलेल्या आंदाजामुळे आयपीएलचा पहिला विजेता राजस्थान रॉयल्स निराश झाला आणि दोघांमध्ये ट्विटर वॉर सुरू झाले.

वास्तविक असे काही घडले की, स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच स्कॉट स्टायरिसने असा अंदाज वर्तविला आहे की, या वेळी कोणता संघ विजेतेपद मिळवेल, कोणता संघ चांगली कामगिरी करेल आणि शेवटी कोणता संघ असेल. स्टायरिसने दिल्ली कॅपिटल्स संघाला विजेतेपदाचा दावेदार असल्याचे सांगितले, पण आयपीएल 2008 चा विजेता राजस्थान रॉयल्सचा आठव्या क्रमांकार राहिल असा अंदाज वर्तविला.

या हंगामातील गुणतालिकेत सर्वात शेवटच्या स्थानावर राहील अशी भविष्यवाणी केल्यानंतर राजस्थान रॉयल्स संघ नाराज दिसला. स्टायरिसच्या ट्विटवर प्रतिक्रिया व्यक्त केली की, “खबरदारी घेत आम्ही हे ट्विट जतन करून ठेवले आहे.” राजस्थान रॉयल्स संघाने स्टायरिसचे आव्हान अप्रत्यक्षरित्या मान्य केले आहे की, त्यांना स्पर्धेत शेवटच्या स्थानावर राहायचे नाही.

स्टायरिसने मुंबई इंडियन्सला त्यांच्या क्रमवारीत दिल्ली कॅपिटल्सनंतर दुसर्‍या स्थानावर ठेवले. कोलकाता नाइट रायडर्स तिसर्‍या आणि चेन्नई सुपर किंग्ज चौथ्या स्थानी आहे. पाचव्या क्रमांकावर सनरायझर्स हैदराबाद आणि सहाव्या क्रमांकावर विराट कोहलीच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आहे. सातव्या क्रमांकावर किंग्ज इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स संघ आठव्या क्रमांकावर आहे.

मात्र, राजस्थान रॉयल्स संघाने प्रतिक्रिया दिल्यानंतर स्टायरिसने आपले स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आणि दुसरे ट्विट करत लिहिले की, “मला ते आवडले, जर तुम्ही मला चुकीचे सिद्ध केले तर. त्यापेक्षा चांगले काहीच असू शकत नाही. पण तुम्हांला मदत करण्यासाठी माझा मुलगा ईश सोढी आहे, मी तुला एकटे सोडू शकत नाही.”

न्यूझीलंडचा फिरकीपटू ईश सोढी राजस्थान रॉयल्सचा फिरकी गोलंदाजी मार्गदर्शक आहे.

स्टिव्ह स्मिथ कर्णधार असलेला राजस्थान रॉयल्सचा संघ या वेळी 22 सप्टेंबर रोजी शारजाहच्या मैदानावर गतउपविजेते असलेल्या चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध पहिला सामना खेळेल.


Previous Post

ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाने केले धोनीचे तोंडभरुन कौतुक; म्हणाला, धोनी माझ्यासाठी नेहमीच…

Next Post

पहिल्या चेंडूवर विकेट व विनींग धाव घेत ‘त्याने’ रचला इतिहास

Related Posts

Photo Courtesy: Facebook/icc
टॉप बातम्या

“इंग्लंडने आपला सर्वोत्तम ताकदीचा संघ न उतरवणे, हा भारताचा अपमान असेल”

January 24, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

“मेलबर्न कसोटी सामन्यापूर्वी दहा वेळा बघितली होती सचिनची ‘ती’ खेळी, अजिंक्य रहाणेने केला उलगडा

January 24, 2021
Photo Courtesy: Twitter/ ICC
टॉप बातम्या

पाकिस्तान संघाचे भारताच्या पावलावर पाऊल; दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी तब्बल ‘इतक्या’ नवोदित खेळाडूंना संधी

January 24, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

SL vs ENG : रूटच्या झुंजार शतकाने इंग्लंडला तारले, दुसरा कसोटी सामना रंगतदार स्थितीत

January 24, 2021
Photo Courtesy: Twitter/BCCI
क्रिकेट

शार्दुल + तेंडूलकर= शार्दुलकर..! सचिनशी तुलना करत भारतीय दिग्गजाने ठाकूरला दिलं नवं टोपणनाव 

January 24, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

राहुल द्रविड यांनी पुन्हा एकदा सिद्ध केला मनाचा मोठेपणा; युवा खेळाडूंच्या यशाचे श्रेय नाकारत म्हणाले…

January 24, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/ ICC

पहिल्या चेंडूवर विकेट व विनींग धाव घेत ‘त्याने’ रचला इतिहास

Photo Courtesy: Twitter/ ICC

मॅक्सवेल-कॅरीचा धमाका! ऑस्ट्रेलियाने जिंकली वनडे मालिका

Photo Courtesy: Twitter/ ICC

भारताच्या त्या अद्भूत विक्रमानंतर आता ऑस्ट्रेलियाने रचला इंग्लंडविरुद्ध इतिहास

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.