आयपीएल २०२०चा ५४ वा सामना रविवारी (१ नोव्हेंबर) दुबईच्या मैदानावर झाला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थान रॉयल्सला ६० धावांनी मात दिली. त्यामुळे गुणतालिकेत मोठी उडी घेत त्यांनी चौथे स्थान पटकावले. तर दुसऱ्या बाजुला राजस्थानची शेवटच्या स्थानावर घसरण झाली. यानंतर राजस्थान संघाचे एक जुने ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागले आहे.
स्कॉट स्टायरिश यांनी आयपीएलपुर्वीच वर्तवला होता अंदाज
झाले असे की, न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक स्कॉट स्टायरिश यांनी आयपीएलच्या १३व्या हंगामाची सुरुवात होण्यापुर्वी एक ट्विट केले होते. त्यामध्ये स्टायरिश यांनी आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या सर्व ८ संघांचा प्लेऑफपुर्वी निकाल कसा असेल, याची यादी दिली होती.
त्यामध्ये दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स हे संघ पहिल्या ४ क्रमांकामध्ये होते. तर राजस्थान संघाला स्टायरिश यांनी सर्वात शेवटचा म्हणजे ८वा क्रमांक दिला होता. त्यांच्या त्या ट्विटला राजस्थानने रिट्विट करत लिहिले होते की, ‘सहज आम्ही हे ट्विट जतन करुन ठेवत आहोत.’
मात्र कोलकाता-राजस्थान संघात साखळी फेरीतील शेवटचा सामना झाल्यानंतर स्टायरिश यांचा अंदाज जवळपास खरा ठरल्याचे दिसत आहे. त्यांनी दिलेल्या यादीनुसार दिल्ली, मुंबई आणि कोलकाता हे संघ टॉप-४ क्रमांकावर आहेत. तर राजस्थान संघ तळाला म्हणजे ८व्या क्रमांकावर आहे. अशाप्रकारे स्टायरिश यांचा अंदाज खरा ठरला आणि राजस्थान तोंडघशी पडल्यामुळे नेटकऱ्यांनी राजस्थानला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
Just casually saving the tweet here. ☺️ https://t.co/hUjprEhDiQ
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) September 15, 2020
I've never seen anything age worse than this tweet😂 should have saved some boundaries instead.
Having said that, incredible journey.. with some unbelievable run chases.. thank you for the memories❤️— Dr. Ipsit Routray (@Ipsit_routray) November 1, 2020
Rr team to admin pic.twitter.com/zIwoa9VqYu
— crick_foot_lover (@strawhatvibss) November 1, 2020
— Jay. (@peak_Ability14) November 1, 2020
Scott Styris right now : pic.twitter.com/MA8mg8JIEK
— 𝑴𝒓. 𝑷𝒆𝒓𝒇𝒂𝒌𝒆𝒕𝒊𝒐𝒏𝒊𝒔𝒕 (@parthology) November 1, 2020
@scottbstyris was right….His prediction was accurate @rajasthanroyals finishing at the bottom
— Bikash Ranjan Nayak (@BikashRanjanNay) November 1, 2020
https://twitter.com/vishnutgopal13/status/1322965305618919425
Please replace that world class bowler jisne last 2 seasons me lutiya duba di 🥴
That most valued indian bowler 🥴— Pulkit Bhansali (@PulkitHappiness) September 17, 2020
कोलकाताच्या प्ले ऑफच्या आशा पल्लवित
राजस्थानला पराभूत करत कोलकाता संघाने त्यांचा हंगामातील ७वा विजय नोंदवला. यासह त्यांच्या खात्यात १४ गुणांची नोंद झाली आहे. तसेच त्यांचा नेट रन रेट -०.२१४ इतका आहे. त्यामुळे कोलकाता संघ प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याच्या शक्यता वाढल्या आहेत. परंतु, साखळी फेरीतील उर्वरित २ सामन्यांच्या निकालाची त्यांना वाट पाहावी लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘सेहवागचा आदर्श डोळ्यापुढे ठेव,’ खराब फॉर्ममध्ये असलेल्या पृथ्वी शॉला माजी क्रिकेटरचा मोलाचा सल्ला
राशिद खानविरुद्ध फटकेबाजी करायचीय, मास्टर ब्लास्टरने दिले ‘हे’ उत्तर
भावा कसं जमलं हे..! दिनेश कार्तिकने एकाच हाताने घेतला भन्नाट झेल; पाहा व्हिडिओ
ट्रेंडिंग लेख-
सुरुवात हुकली पण शेवट आमचाच! आयपीएलच्या दुसऱ्या हाफमध्ये शानदार कामगिरी करणारे ३ संघ
एका ऑस्ट्रेलियननेच त्याला बनवले ‘व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण’
IPL 2020: प्रतिभाशाली असूनही पंजाब संघाकडून एकाही सामन्यात संधी न मिळालेले ५ युवा क्रिकेटर्स