आयपीएल २०२२चा हंगाम शेवटाकडे चालला असून प्लेऑफचे चित्र हळूहळू स्पष्ट होत आहे. राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झालेला साखळी फेरीतील ६८वा सामना संजू सॅमसनच्या नेतृत्त्वाखालील संघाने ५ विकेट्स राखून जिंकला. या विजयासह राजस्थानने प्लेऑफचे तिकीट मिळवले असून गुणतालिकेतही भरारी घेतली आहे.
चेन्नईवर ५ विकेट्सने विजय मिळवत (Rajasthan Beat Chennai) राजस्थान गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. साखळी फेरीतील १४ पैकी ९ सामने जिंकत राजस्थानच्या खात्यात १८ गुण जमा झाले आहेत. गुणांच्या बाबतीत राजस्थानने प्लेऑफसाठी पात्र ठरलेला दुसरा संघ, लखनऊ सुपरजायंट्सची (Lucknow Supergaints) बरोबरी केली आहे. लखनऊच्या खात्यातही १४ पैकी ९ सामने जिंकत १८ गुण आहेत.
परंतु राजस्थानने (Rajasthan Royals) नेट रन रेटच्या जोरावर लखनऊला पछाडत दुसऱ्या स्थानावर ताबा मिळवला आहे. राजस्थानचा नेट रन रेट +०.२९८ इतका झाला आहे. तर लखनऊचा नेट रन रेट +०.२५१ असल्याने त्यांना तिसऱ्या स्थानावर घसरावे लागले आहे. यानंतर लखनऊच्या पहिल्या क्वालिफायर सामन्यासाठी पात्रता मिळवण्याच्या आशांना धक्का बसला आहे. राजस्थानने गुणतालिकेत लखनऊला पछाडत पहिल्या क्वालिफायर सामन्यासाठी पात्रता मिळवली आहे. पहिल्या क्वालिफायर (Qualifier One) सामन्यात त्यांचा प्रतिस्पर्धी गुजरात टायटन्स संघ असेल. तर लखनऊला आता एलिमिनेटर सामना खेळावा लागेल.
3⃣ Places in the Playoffs, sealed. 👍
Who will grab the 4⃣th & final spot in the Playoffs? 🤔#TATAIPL | #RRvCSK pic.twitter.com/ZxVnKgAQkV
— IndianPremierLeague (@IPL) May 20, 2022
राजस्थानकडे थेट अंतिम सामन्यात पोहोचण्याची संधी
आता २४ मे रोजी, कोलकाता येथे राजस्थान विरुद्ध गुजरात (Rajasthan Royals vs Gujrat Titans) संघांमध्ये पहिला क्वालिफायर सामना होईल. हा सामना जिंकणारा संघ थेट अंतिम सामन्यात प्रवेश करेल. तर पराभूत होणाऱ्या संघाला अंतिम सामन्याचे तिकीट मिळवण्यासाठी आणखी एक संधी मिळेल. पहिल्या क्वालिफायर सामन्यात पराभूत होणारा संघ एलिमिनेटर सामन्यातील विजेत्या संघासोबत दुसरा क्वालिफायर सामना खेळेल. हा दुसरा क्लालिफायर सामना जिंकणारा संघ अंतिम सामन्यात जाईल.
अशात आता २००८ आयपीएलचा विजेता राजस्थान हा कारनामा करून दाखवेल की नाही, यावर क्रिकेटप्रेमींचे लक्ष असेल.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलच्या पॉवरप्लेमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या फलंदाजांमध्ये मोईन भाऊंचाही नंबर, पाहा किती धावा चोपल्यात
जयस्वालचे अर्धशतक, तर अश्विनची झुंजार खेळी; चेन्नईला पराभूत करत राजस्थान प्लेऑफसाठी क्वालिफाय