राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात शनिवारी (दि. ०७ मे) इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील ५२वा सामना पार पडला. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर खेळण्यात आला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने ६ विकेट्सने विजय मिळवला. हा राजस्थानचा हंगामातील सातवा विजय होता. राजस्थानच्या विजयाचे हिरो शिमरॉन हेटमायर आणि देवदत्त पडिक्कल ठरले.
या सामन्यात नाणेफेक जिंकून पंजाब किंग्स (Punjab Kings) संघाने फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी फलंदाजी करताना पंजाबने निर्धारित २० षटकात ५ विकेट्स गमावत १८९ धावांचा पाऊस पाडला होता. पंजाबकडून मिळालेल्या १९० धावांचे आव्हान राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाने १९.४ षटकात पूर्ण केले आणि सामना खिशात घातला.
Match 52. Rajasthan Royals Won by 6 Wicket(s) https://t.co/Oj5tAfX0LP #PBKSvRR #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) May 7, 2022
राजस्थानकडून फलंदाजी करताना सलामीवीर यशस्वी जयसवालने सर्वाधिक धावा चोपल्या. त्याने ४१ चेंडूंचा सामना करताना ६८ धावा केल्या. या धावा करताना त्याने २ षटकार आणि ९ चौकारांचा पाऊस पाडला. त्याच्याव्यतिरिक्त देवदत्त पडिक्कल आणि शिमरॉन हेटमायरने प्रत्येकी ३१, जोस बटलरने ३०, कर्णधार संजू सॅमसनने २३ धावांचे योगदान दिले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
यावेळी पंजाबकडून गोलंदाजी करताना अर्शदीप सिंगने सर्वाधिक विकेट्स घेण्याची कामगिरी केली. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना २९ धावा दिल्या आणि २ विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त रिषी धवन आणि कागिसो रबाडाने प्रत्येकी १ विकेट घेतली.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्स यांनी जॉनी बेअरस्टोने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ४० चेंडूंचा सामना करताना ५६ धावा केल्या. या धावा करताना त्याने १ षटकार आणि ८ चौकारही मारले. त्याच्याव्यतिरिक्त जितेश शर्माने नाबाद ३८, भानुका राजपक्षने २७ आणि लियाम लिविंगस्टोनने २२ धावा केल्या. यांच्याव्यतिरिक्त इतर कोणालाही २० धावांचा आकडा पार करता आला नाही.
यावेळी राजस्थानकडून गोलंदाजी करताना युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) पुन्हा एकदा चमकला. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना २८ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त प्रसिद्ध कृष्णा आणि रविचंद्रन अश्विनने प्रत्येकी १ विकेट आपल्या नावावर केली.
या विजयासह राजस्थान गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे, तर पंजाब संघ सातव्या क्रमांकावर आहे.
ही बातमी अपडेट होत आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘आम्ही चुका केल्या, ज्याचे परिणाम भोगावे लागले’, पराभवानंतर हार्दिक पंड्याने सांगितली कुठे झाली चूक
लखनऊने जिंकली मनं! आईच्या सन्मानासाठी खेळाडू खास जर्सीसह उतरणार पुण्याच्या मैदानात
“वॉर्नर सरावापेक्षा जास्त पार्ट्या करायचा, सतत टीममेट्सशी भांडल्यामुळे संघाबाहेरही केले होते”