---Advertisement---

GT vs RR: राजस्थानने जिंकला टॉस, गुजरातला फलंदाजीचे आमंत्रण! पहा दोन्ही संघांच्या प्लेइंग 11

On: सोमवार, एप्रिल 28, 2025 7:09 PM
---Advertisement---

आयपीएल 2025च्या 47व्या सामन्यात आज (28 एप्रिल) शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स आणि रियान परागच्या नेतृत्वाखालील राजस्थान राॅयल्स संघ आमने-सामने असतील. (GT vs RR) दरम्यान दोन्ही संघ राजस्थानच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर भिडताना दिसतील.

दोन्ही संघांच्या प्लेइंग 11-

राजस्थान राॅयल्स- यशस्वी जयस्वाल, वैभव सूर्यवंशी, नितीश राणा, रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), शिमरॉन हेटमायर, वनिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, माहेश थीक्षाना, संदीप शर्मा, युद्धवीर सिंग चरक

गुजरात टायटन्स साई सुदर्शन, शुबमन गिल (कर्णधार), जोस बटलर (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शाहरुख खान, राहुल तेवतिया, करीम जनात, रशीद खान, रवि श्रीनिवासन साई किशोर, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा

यंदाच्या आयपीएल हंगामात शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने दमदार कामगिरी केली आहे. संघाने या हंगामात आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत. दरम्यान त्यांनी 6 सामन्यात विजय मिळवला, तर 2 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. गुजरातचा संघ गुणतालिकेत 12 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. आजचा सामना जिंकून गुजरातचा संघ प्लेऑफच्या दिशेने मजबूत पाऊल टाकण्याचा प्रयत्न करेल.

दुसरीकडे राजस्थान राॅयल्सची कामगिरी खूपच खराब राहिली आहे. यंदाच्या हंगामात संघाने 9 सामने खेळले. दरम्यान त्यांना फक्त 2 सामने जिंकता आले, तर 7 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. राजस्थानचा संघ जवळपास यंदाच्या हंगामातील प्लेऑफ रेसमधून बाहेर पडला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---