---Advertisement---

आरसीबी हारली, पण पाटीदारने मनं जिंकली; ८ वर्षांनंतर पहिल्यांदाच भारतीयाने आयपीएलमध्ये ‘ही’ कमाल केली

On: शुक्रवार, मे 27, 2022 11:18 PM
Rajat-Patidar
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२२चा दुसरा क्वालिफायर सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला गेला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात बेंगलोरने प्रथम फलंदाजी करताना १५७ धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थानने १८.१ षटकातच हे लक्ष्य सहज गाठले. भलेही बेंगलोरने ७ विकेट्सने हा सामना गमावला. मात्र बेंगलोरकडून अर्धशतक करत रजत पाटीदार याने मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

पाटीदार (Rajat Patidar) आयपीएलच्या प्लेऑफमधील एलिमिनेटर (Eliminator Match) सामना आणि दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात ५० किंवा त्यापेक्षा जास्त धावा करणारा तिसराच फलंदाज ठरला आहे. पाटीदारने राजस्थानच्या गोलंदाजांचा सामना करत ४२ चेंडूत ३ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने ५८ धावा फटकावल्या. तो बेंगलोरकडून दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज राहिला. तसेच तत्पूर्वी एलिमिनेटर सामन्यात त्याने ५४ चेंडूत नाबाद ११२ धावा केल्या होत्या. या खेळीदरम्यान त्याने ७ षटकार आणि १२ चौकारही मारले होते.

अशाप्रकारे पाटीदारने एलिमिनेटर आणि दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात सलग ५० पेक्षा जास्त धावा करण्याचा पराक्रम केला आहे. तो असे करणारा आयपीएल इतिहासातील केवळ तिसराच फलंदाज ठरला आहे. तसेच ही करामत करणारा भारताचा फक्त दुसरा फलंदाज बनला आहे. पाटीदारपूर्वी सुरेश रैना आणि केन विलियम्सन यांनी ही कमाल केली होती. रैनाने २०१४ साली एलिमिनेटर आणि दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात लागोपाठ धावांची पन्नाशी पार केली होती. 

दरम्यान पाटीदारने चालू आयपीएल हंगामात बेंगलोरकडून ८ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून ५५.५०च्या सरासरीने ३३३ धावा निघाल्या आहेत. यात त्याच्या १ शतक आणि २ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याच्या एकूण आयपीएल कारकिर्दीवर नजर टाकायची झाल्यास, त्याने १२ आयपीएल सामने खेळताना ४०.४० च्या सरासरीने ४०४ धावा केल्या आहेत.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

राजस्थानच ठरला ‘रॉयल!’ बेंगलोरला ७ विकेट्सने हरवत IPL 2022 ट्रॉफीसाठी फायनलमध्ये गुजरातला देणार टक्कर

सोप्पं नाहीये! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी भारतीय खेळाडूंना द्यावी लागणार ‘ही’ मोठी परीक्षा

अर्रर्र! आख्ख्या हंगामात फक्त एकट्या विराटवरच आली ‘अशी’ नामुष्की, वाचा लाजीरवाण्या विक्रमाबद्दल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---