आयपीएल (Indian Premier League 2025) पूर्वी ‘रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू’साठी (Royal Challengers Bengaluru) एक आनंदाची बातमी आहे. वास्तविक, आरसीबीचा खेळाडू ‘रजत पाटीदार’ने (Rajat Patidar) ‘विजय हजारे ट्रॉफी’मध्ये (Vijay Hazare Trophy) बंगालविरूद्ध दमदार खेळी केली. रजतने 137 चेंडूत 132 धावांची नाबाद शतकी खेळी केली.
खरे तर मध्य प्रदेशला विजयासाठी 270 धावांचे लक्ष्य होते, परंतु मध्य प्रदेश संघ 2 धावांवर 2 विकेट्स गमावून संघर्ष करत होता. यानंतर मध्य प्रदेशचा कर्णधार रजत पाटीदार (Rajat Patidar) याने संघाची धुरा हातात घेत, बंगालच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. बंगाल संघात स्टार ‘मोहम्मद शमी’सारखे (Mohammed Shami) गोलंदाज होते.
‘रजत पाटीदार’च्या (Rajat Patidar) शतकी खेळीमुळे मध्य प्रदेशने 46.2 षटकांत 4 विकेट्स गमावून लक्ष्य गाठले. या दमदार खेळीसाठी मध्य प्रदेशचा कर्णधार रजत पाटीदारला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. वास्तविक, आयपीएल मेगा लिलाव (Mega Auction 2025) पूर्वी रजत पाटीदार रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमधून निवृत्त झाला होता. मात्र, आता रजत पाटीदारचा फॉर्म पहिल्या आयपीएल विजेतेपदाच्या शोधात असलेल्या बंगळुरूसाठी चांगला संकेत असल्याचे मानले जात आहे.
मध्य प्रदेश विरूद्ध बंगाल संघातील सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या बंगालने 50 षटकात 7 विकेट्स गमावून 269 धावा केल्या. अशाप्रकारे रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील मध्य प्रदेशला विजयासाठी 270 धावांचे लक्ष्य होते. मध्य प्रदेशने 46.2 षटकांत 4 बाद 271 धावा करत सामना जिंकला. मात्र, याआधी मध्य प्रदेशची सुरुवात चांगली झाली नाही. मध्य प्रदेशचे पहिले दोन फलंदाज अवघ्या 2 धावांवर तंबूत परतले, मात्र यानंतर रजतने वादळी खेळी केली. त्यामुळे मध्य प्रदेशने बंगालचा 6 गडी राखून धुव्वा उडवला.
रजत पाटीदारने शेवटच्या आयपीएल हंगामात आरसीबीसाठी 15 सामने खेळले. त्यामध्ये त्याने 177.13च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना 395 धावा केल्या होत्या. दरम्यान त्याची फलंदाजी सरासरी 30.38 राहिली. शेवटच्या हंगामात त्याने आरसीबीसाठी 5 अर्धशतके झळकावली. दरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या 55 होती.
महत्त्वाच्या बातम्या-
बाप तसा लेक! वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून वीरेंद्र सेहवागच्या मुलाचा गोलंदाजीत जलवा
“कोचिंग स्टाफ काय करतोय?”, सिडनीतील पराभवानंतर दिग्गज खेळाडू भडकले
सुनील गावस्कर संतापले! मालिका विजयानंतर ऑस्ट्रेलियानं केला जाहीर अपमान