---Advertisement---

आरसीबीचा हिरो ठरलेल्या रजत पाटीदार किती करतो कमाई? जाणून घ्या सविस्तर

On: सोमवार, मे 30, 2022 3:59 PM
Rajat-Patidar
---Advertisement---

इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) २०२२ चा हंगाम आता समाप्त झाला आहे. यंदाच्या हंगामात गुजरात टायटन्स या नव्या संघाने आपले नाव आयपीएल ट्रॉफीवर कोरले. आयपीएलचा अंतिम सामना गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघात संपन्न झाला. मात्र, या दोन्ही संघासह नेहमीप्रमाणे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने आपली वेगळी ओळख दाखवून दिली.

यावेळी आरसीबीला दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात पराभव पत्कारावा लागला. मात्र, यंदाच्या वर्षी आरसीबीसाठी विराट कोहलीपेक्षा जास्त चर्चा झाली ती रजत पाटीदार या नावाची. युवा रजत पाटीदारला यंदाच्या आयपीएलमधून किती कमाई झाली आणि त्याची लाईफस्टाईल कशी आहे ते जाणून घेऊयात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rajat Patidar ???? (@rrjjtt_01)

आरसीबीने पहिल्या एलिमिनेटरमध्ये लखनऊ सुपर जाएंट संघाला पराभूत केले. लखनऊविरुद्ध आरसीबीच्या विजयाचे सर्वात मोठे श्रेय रजत पाटीदारला (Rajat Patidar) मिळाले. रजत पाटीदारला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. सोशल मीडियावर त्याच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

खरंतर रजत आयपीएल २०२२ लिलावात अनसोल्ड राहिला होता. त्यामुळे त्याने ९ मे रोजी लग्न करण्याचाही विचार केला होता. पण त्याआघीच लवनीथ ससोदिया दुखापतग्रस्त झाला आणि २० लाखांच्या किमतीत रजत पाटीदारला संघात संधी मिळाली. या संधीचे त्यानेही सोने केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rajat Patidar ???? (@rrjjtt_01)

रजत पाटीदारचे करिअर

मध्यप्रदेशातील इंदोर येथे राहणारे रजत पाटीदार यांचे वडील व्यापारी आहेत. रजतचा जन्म १ जून १९९३ रोजी झाला. तो मध्य प्रदेशकडून खेळतो. २०१५-१६ मध्ये बडोदा आणि मध्यप्रदेश दरम्यान झालेल्या रणजी ट्रॉफीमध्ये त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर २०१७-१८ विभागीय टी२० लीगमध्ये ८ जानेवारी २०१८ रोजी त्याने टी२० पदार्पण केले. यानंतर तो रणजी ट्रॉफी २०१८-१९ मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. रजतने आठ सामन्यांत ७१३ धावा केल्या होत्या. रजत पाटीदारने २०२१ च्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून पदार्पण केले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rajat Patidar ???? (@rrjjtt_01)

रजतची एकुण संपत्ती

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रजत पाटीदारची एकूण संपत्ती ३.५ ते ४ कोटी रुपये आहे. तो फक्त क्रिकेटमधून पैसे कमावतो. देशांतर्गत सामन्यांव्यतिरिक्त तो आयपीएल आणि जाहिरातीतून रजतची प्रमुख कमाई होते. आयपीएल २०२२ मधील आपल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या रजत पाटीदारला २०२१ आयपीएल लिलावात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने २० लाख रुपयांच्या मूळ किमतीत विकत घेतले.

मात्र, आरसीबीने यंदाच्या आयपीएलमध्ये पाटीदारला कायम ठेवले नाही. त्याचवेळी मेगा लिलावात रजत पाटीदार विकला गेला नाही. मात्र नंतर पाटीदार यांना २० लाख रुपये घेण्यात आले. आयपीएल व्यतिरिक्त, पाटीदार महिन्याला १३ लाख रुपये कमवतो आणि घरगुती संघ आणि इतर माध्यमातून वार्षिक ३५ लाख रुपये कमावतो.

व्हॉट्सअपवर अपडेट मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा

आयपीएल कॉमेंटेटरना पगार मिळतो तरी किती? घ्या जाणून

आरसीबीला आड आला, तो नेहमीच पाण्यात गेला! मुंबई, सीएसकेसारखं संजूच्या टीमचंही भंगल स्वप्न

एकट्या महाराष्ट्रात ३ शहरांत आहेत चक्क ७ आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम्स, कोणते ते घ्या जाणून

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---