भारतीय क्रिकेट नियमाक मंडळ आगामी वनडे विश्वचषकाच्या तयारीत आहे. यावर्षीचा विश्वचषक भारतात खेळला जाणार असून बीसीसीआय या स्पर्धेसाठी देशातील 10 स्टेडियम तयार करत आहे. विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने एक खास गोष्ट सुरू केली आहे. मंगळवारी (19 सप्टेंबर) बीसीसीआयकडून सुपरस्टार रजनीकांत आणि बोर्डाचे सचिव जय शाह यांचा खास फोटो शेअर केला गेला.
वनडे विश्वचषक 2023 साठी जगभारतील क्रिकेटप्रेमी उत्सुक आहेत. विश्वचषक सामन्यासाठी बीसीसीआयकडून नामांकीत व्यक्तिंना गोल्डन तिकिट दिले जात आहे. याआधी बॉलिवूडचा महान अभिनेता अमिताभ बच्चन आणि सचिन तेंडुलकर यांना गोल्डन तिकिट दिले गेले होते. मंगळवारी बीसीसीआय सचिव जय शाह यांनी स्वतः सुपरस्टार रजनीकांत यांची भेट घेतली आणि विश्वचषकाचे गोल्डन तिकिट दिले. बीसीसीआयकडून हा फोटो शेअर करताना कॅप्शन दिले गेले की, “बीसीसीआयचे माननीय सचिव जय शाह यांनी श्री रजनीकांत यांना गोल्डन तिकिट देऊन सन्मानित केले. दिग्गज अभिनेत्याने कोट्यावधी चाहत्यांच्या मनाव अमिट छाप पाडली आहे.”
The Phenomenon Beyond Cinema! ????
The BCCI Honorary Secretary @JayShah presented the golden ticket to Shri @rajinikanth, the true embodiment of charisma and cinematic brilliance. The legendary actor has left an indelible mark on the hearts of millions, transcending language and… pic.twitter.com/IgOSTJTcHR
— BCCI (@BCCI) September 19, 2023
दरम्यान, आगामी वनडे विश्वचषकाची सुरुवात 5 ऑक्टोबर रोजी होणार आहे. तर विश्वचषकाचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी खेळला जाईल. यजमान पहिला सामना गतविजेता इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणार आहे. भारताला आपला पहिला विश्वचषक सामना बलाढ्या ऑस्ट्रेलियासोबत 8 ऑक्टोबर रोजी खेळायचा आहे. तत्पूर्वी भारताला मायदेसात ऑस्ट्रेलियासोबत तीन वनडे सामन्यांची मालिका खेळायची आहे. ही मालिका 22 ते 27 सप्टेंबर यादरम्यान खेळली जाईल. सोमवारी (18 सप्टेंबर) बीसीसीआयने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ घोषित केला. (Rajinikanth was given a golden ticket for the World Cup by Jai Shah)
ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या दोन वनडे सामन्यांसाठी भारतीय संघ –
केएल राहुल (कर्णधार), रविंद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, ईशान किशन, शार्दुल ठाकूर, वॉशिंगटन सुंदर, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यांसाठी भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, ईशान किशन, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.
महत्वाच्या बातम्या –
उपकर्णधाराचे संघातील स्थान धोक्यात! ‘या’ कारणास्तव विश्वचषकातून नाव कापले जाणार?
रडणार नाही लढणार! निवडकर्ते आणि संघ व्यवस्थापनाकडून दुर्लक्ष झालेल्या सॅमसनची पोस्ट व्हायरल