इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२ चा हंगाम सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. तत्पूर्वी १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी बंगळुरू येथे आयपीएलचा मेगा लिलाव पार पडला. या लिलावात लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात जायंट्स या २ नव्या संघांसह जुने ८ संघ सहभागी झाले होते. त्यामुळे बऱ्याचशा खेळाडूंना आपल्या ताफ्यात सहभागी करण्यासाठी फ्रँचायझींमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. या लिलावात अनकॅप्ड खेळाडूंच्या यादीतील देवदत्त पडीक्कल याला विकत घेण्यासाठी फ्रँचायझींमध्ये मोठी स्पर्धा पाहायला मिळाली.
अवघ्या २० लाखांच्या मूळ किंमतीसह लिलावात उतरलेल्या पडीक्कलला विकत घेण्यासाठी मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स संघांमध्ये स्पर्धा झाली. अखेर राजस्थान संघाने त्याला ७ कोटी ७५ लाखांच्या किंमतीला विकत घेतले आहे. त्याच्या जुन्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने फाफ डू प्लेसिसला सलामीवीर म्हणून विकत घेतले असल्याने त्यांनी पडीक्कलवर बोली लावण्यात रस दाखवला नाही.
.@devdpd07 is SOLD to @rajasthanroyals for INR 7.75 Crore 😎😎#TATAIPLAuction @TataCompanies
— IndianPremierLeague (@IPL) February 12, 2022
पडीक्कल आयपीएलमधील प्रतिभाशाली अनकॅप्ड खेळाडूंपैकी एक आहे. तो गेल्या २ वर्षांपासून आयपीएलमध्ये खेळत असून त्याने आपल्या दमदार फटकेबाजीसह फ्रँचायझींवर आपली छाप सोडली आहे. तो आयपीएल २०२१ मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ११ व्या क्रमांकावर राहिला होता. त्याने गतवर्षी बेंगलोरकडून खेळताना १४ सामन्यांमध्ये एका शतकासह ४११ धावा केल्या होत्या. तसेच त्याच्या एकंदर आयपीएल कारकिर्दीविषयी बोलायचे झाल्यास, आतापर्यंत २९ सामने खेळताना ८८४ धावा आपल्या खात्यात नोंदवल्या आहेत.
त्यामुळे आता नव्या राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळताना तो कशी कामगिरी करतो हे पाहावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या-
‘किंग खान’च्या अनुपस्थितीत मुलगा आर्यन आणि मुलगी सुहानाची लिलावाला हजेरी, फोटो तुफान व्हायरल
IPL Auction: डेव्हिड वॉर्नरची घरवापसी! दिल्ली कॅपिटल्सने ‘एवढ्या’ कोटींसह घेतले विकत