भारताचा शूटिंगमध्ये ऑलम्पिक रौप्यपदक विजेता खेळाडू राजवर्धनसिंग राठोड यांची केंद्रीय क्रीडा मंत्री म्हणून निवड झाली आहे. त्यांच्या अगोदरच क्रीडा मंत्री असणारे विजय गोयल यांना बढती देऊन त्यांना संसदीय कामकाज मंत्री करण्यात आले आहे. एखाद्या खेळाडूला क्रीडामंत्री करण्याची भारताच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे.
राजवर्धनसिंग राठोडने २००४ अथेन्स ऑलम्पिकमध्ये एअर रायफलच्या डबल ट्राप प्रकारात भारतासाठी रौप्य पदक जिंकले होते. या ऑलम्पिकमध्ये भारत केवळ एकच पदक जिंकू शकला होता. या कामगिरीचे सर्व स्थरातून कौतुक होऊन त्यांना २००८ साली बिजींग ऑलम्पिकसाठी भारताचा ध्वजवाहक होण्याचा मान मिळाला होता.
राजकीय कारकीर्द-
२०१३ साली आर्मीमधून निवृत्त झाल्यावर राजवर्धनसिंग राठोड यांनी १० सप्टेंबर २०१३ रोजी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता. २०१४ साली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकात त्यांनी जयपूर ग्रामीण मधून उमेदवारी अर्ज केला. या निवडणुकीत त्यांना यश मिळाले आणि ते खासदार म्हणून निवडून आले. ९ नोव्हेंबर २०१४ रोजी त्यांनी माहीती आणि प्रसारण मंत्री म्हणून शपथ घेतली होती.
शूटिंग मधील डबल ट्राप प्रकारातील कामगिरी-
#१ ऑलम्पिक मधील कामगिरी-
अथेन्स २००४ -डबल ट्राप – रौप्य पदक
#२ कॉमनवेल्थ गेम्स
मँचेस्टर २००२ – डबल ट्राप वयक्तिक- सुवर्ण पदक
मँचेस्टर २००२ – डबल ट्राप सांघीक – सुवर्ण पदक
मेलबॉर्न २००६ – डबल ट्राप वयक्तिक- सुवर्ण पदक
मेलबॉर्न २००६ – डबल ट्राप सांघीक -रौप्य पदक
#३ आशियायी खेळ-
दोहा २००६- डबल ट्राप सांघीक -रौप्य पदक
दोहा २००६- डबल ट्राप वयक्तिक- कांस्य पदक
#४ जागतीक शॉटगन स्पर्धा
साइप्रर्स २००३- डबल ट्राप वयक्तिक- कांस्य पदक
#५ जागतीक अजिंक्यपद फायनल्स
ग्रॅनडा २००६- डबल ट्राप वयक्तिक- कांस्य पदक
#६ जागतीक अजिंक्यपद स्पर्धा
सिडनी २००४- डबल ट्राप वयक्तिक- सुवर्ण पदक
कैरो २००६- डबल ट्राप वयक्तिक- सुवर्ण पदक
२००३ नवी दिल्ली -डबल ट्राप वयक्तिक- कांस्य पदक
#७ एशियन क्ले टार्गेट चॅम्पियनशिप
२००३ नवी दिल्ली -डबल ट्राप वयक्तिक- सुवर्ण पदक
२००४ बॅंकॉक -डबल ट्राप वयक्तिक- सुवर्ण पदक
२००५ बॅंकॉक -डबल ट्राप वयक्तिक- सुवर्ण पदक
२००६ सिंगापूर -डबल ट्राप वयक्तिक- सुवर्ण पदक
२०११ क्वालालंपूर -डबल ट्राप वयक्तिक- सुवर्ण पदक