पाचव्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत अंतिम पात्रता फेरीत रामकुमार रामनाथन याने मातिया बेलुसीचा पराभव करून मुख्य फेरीत प्रवेश केला. 28 वर्षीय वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश केलेल्या रामकुमार याने सुरेख खेळ करत इटलीच्या तिसऱ्या मानांकित मातिया बेलुसीचा 6-3, 7-5 असा पराभव केला.
रामनाथन हा दक्षिण आशियातील एकमेव एटीपी 250 स्पर्धेत मुख्य ड्रॉ मध्ये खेळणारा चौथा भारतीय खेळाडू आहे. महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या वतीने व महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने या पाचव्या सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
भारताचा अव्वल मानांकित मुकुंद ससीकुमार, सुमित नागल आणि 15 वर्षीय मानस धामणे हे Mattia Bellucci अन्य तीन भारतीय खेळाडू मुख्य ड्रॉ मध्ये झुंजनार आहेत.
याशिवाय, युकी भांब्रीला गतवर्षीच्या उपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या एलियास यमेर कडून 1-6, 4-6 असा पराभव पत्करावा लागला .
मॅक्सीमिलन मार्तर आणि फ्लाविओ कोबोली यांनी देखील मुख्य फेरीत प्रवेश केला. मार्तर याने निकोला मिलोजेविकचा 6-2, 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव करून आगेकूच केली. तर, कोबोलो याने झेनेक कोलरचा 6-4 6-4. असा संघर्षपूर्ण पराभव केला
मूळच्या पुण्याच्या धामणेचे आव्हान सोमवारपासून मुख्य ड्रॉ मध्ये सूरू होणार पहिल्या फेरीत त्याच्यापुढे अमेरिकेच्या मायकेल मोहचे आव्हान असणार आहे. तर, सुमित नागल विरुध्द फिलीप क्राजिनोविकचे आव्हान असणार आहे. आयएमजीच्या मालकीच्या आणि राईजन जागतिक स्तरावर व्यवस्थापन केलेल्या टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेला टाटा समूहाचे प्रायोजकत्व लाभले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वाढदिवस विशेष: भारत-आयर्लंडकडून क्रिकेट खेळणारे रमन लांबा, बांगलादेशातही मिळालं प्रेम
ओडिशा एफसी आयएसएलमध्ये मुंबई सिटीविरुद्ध नशीब पालटण्यासाठी मैदानावर उतरणार