गेले काही दिवस हे पाकिस्तान क्रिकेटसाठी खूप कठीण राहिले आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी न्यूझीलंड संघाने वनडे सामना सुरू होण्याच्या दोन तासांपूर्वी मालिका रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. तर, नुकताच इंग्लंड संघाने देखील सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानचा दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
इंग्लंडचा महिला आणि पुरुष संघ ऑक्टोबर महिन्यात इंग्लंडचा दौरा करणार होता. परंतु, ईसीबीने हा दौरा रद्द केला आहे. ईसीबीने घेतलेला हा निर्णय पीसीबीचे नवे अध्यक्ष रमिज राजा यांना आवडला नाहीये. दरम्यान त्यांनी इंग्लंड आणि न्यूझीलंडला धमकी देखील दिली आहे.
क्रिकबजच्या माध्यमातून रमिज राजा यांनी म्हटले की, “आतापर्यंत टी -२० विश्वचषक स्पर्धेत आमच्या निशाण्यावर फक्त भारतीय संघ होता. परंतु आता आणखी दोन संघ वाढले आहेत. न्यूझीलंड आणि इंग्लंडने दौरा रद्द करून खूप चुकीचे केले आहे. त्याचा बदला आम्ही मैदानावर घेणार. हा आमच्यासाठी एक मोठा धडा आहे. कारण आम्ही जेव्हा त्यांच्या देशात मालिका खेळण्यासाठी जातो, तेव्हा आम्हाला ही कठोर विलगीकरणाचा कालावधी पूर्ण करावा लागतो. आम्ही त्यांचे उपदेश पाळतो हा आमच्यासाठी एक धडा आहे.”
तसेच ते पुढे म्हणाले की, “आता आम्ही तेवढेच पुढे जाऊ, जेवढे आमच्या हिताचे असेल. तुम्ही सुरक्षा आणि धारणांच्या आधारावर कोणतेही निर्णय घेऊ शकता. राग होता, कारण न्यूझीलंडने त्यांच्यासमोर येणाऱ्या धोक्याबद्दल कोणतीही माहीती न देता दौरा रद्द केला आणि आता इंग्लंडने, पण आम्हाला अपेक्षा होती.”
इंग्लंडच्या महिला आणि पुरुष संघाला पाकिस्तान संघाविरुद्ध वनडे आणि टी -२० सामन्यांची मालिका खेळायची होती.पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड पुरुष संघांमध्ये १३ आणि १४ ऑक्टोबर रोजी टी -२० मालिका पार पडणार होती. या मालिकेला आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेपूर्वी सराव मालिका म्हणून देखील पाहिले जात होते. तर इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान महिला संघांमध्ये १७,१९ आणि २१ ऑक्टोबर रोजी ३ वनडे सामन्यांची मालिका रंगणार होती.
महत्त्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलियन महिलांची ऐतिहासिक कामगिरी; भारताला पराभूत करताच ‘विश्वविक्रमाला’ गवसणी
बी.कॉम टॉपर, सीए, एमबीए असलेला केकेआरचा ‘स्कॉलर’ अय्यर
एमएस धोनीनंतर कोण होऊ शकतो चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार? ‘हे’ चार नावं आहेत सर्वात पुढे