---Advertisement---

कॅच रे भाई! रामकृष्ण घोषने पकडला MPL 2025 मधील टॉप कॅच, व्हिडिओ पाहा

On: शनिवार, जून 21, 2025 10:02 PM
---Advertisement---

महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 चा क्वालिफायर 2 सामना शनिवारी (21 जून) खेळला गेला. रायगड रॉयल्स विरुद्ध पुणेरी बाप्पा यांच्या दरम्यान झालेल्या या सामन्यात पुणेरी बाप्पा संघाने रायगडला 133 धावांवर रोखण्याची कामगिरी केली. पुणेरी बाप्पासाठी सर्वोत्तम गोलंदाजी करणाऱ्या रामकृष्ण घोष याने एक अफलातून झेल देखील पकडला. या झेलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर ‌व्हायरल होत आहे.

क्वालिफायर 1 मध्ये पराभूत झाल्यानंतर पुणेरी बाप्पा या सामन्यासाठी मैदानात उतरले. तर, एलिमिनेटर सामन्यात विजय मिळवून रायगड रॉयल्स यांनी क्वालिफायर दोन गाठलेली. रायगड रॉयल्सला या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाली. सलामीवीर विकी ओस्तवाल हा केवळ 11 धावा करून बाद झाला. त्यानंतर ओंकार खाटपे व सिद्धेश वीर यांच्या दरम्यान 37 चेंडूंमध्ये 42 धावांची संथ भागीदारी झाली. त्यानंतर पुन्हा एकदा ऋषभ राठोड आणि सिद्धेश यांनी 19 चेंडूंमध्ये केवळ 9 धावा केल्या.

यानंतर फलंदाजीला आलेला नीरज जोशी काहीसा चाचपडताना दिसला. नीरज 10 चेंडूंमध्ये पाच धावा करून बाद झाला. मात्र, त्याला बाद करताना रामकृष्ण घोष याने एक शानदार झेल पकडला. नीरज याने यश क्षीरसागर याच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटला लागून सीमापार चाललेल्या या चेंडूला लॉंग ऑनला असलेल्या घोष याने धावत येत एका हातात झेलले. त्यानंतरही त्याने आपले संतुलन साधत आपला पाय सीमारेषेला लागू दिला नाही. नीरज बाद झाल्यामुळे रायगडच्या मोठ्या धावसंख्येच्या आशांना हादरा बसला.

रामकृष्ण घोषने या सामन्यात पुणेरी बाप्पा संघासाठी सर्वोत्तम गोलंदाजी केली. त्याने आपल्या चार षटकांमध्ये केवळ 25 धावा देताना, दोन महत्त्वपूर्ण फलंदाज बाद केले. नीरज जोशी याच्या व्यतिरिक्त त्याने हर्ष संघवी याचादेखील झेल पकडला.

एमपीएल 2025 मध्ये आतापर्यंत काही शानदार झेल पाहायला मिळाले आहे. पुणे बाप्पाच्या नौशाद शेख, ईगल नाशिक टायटन्सच्या अथर्व काळे, पीबीजी कोल्हापूर टस्कर्सच्या सिद्धार्थ म्हात्रे आणि रत्नागिरी जेट्सच्या अभिषेक पवार यांनी काही अप्रतिम झेल टिपले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---