मुंबई शहर कबड्डीत असोसिएशनच्या मान्यतेने कै. सुषमा दत्तात्रय परब व कै. मानसी हरिष घाडी यांच्या स्मरणार्थ रण झुंजार संघ आयोजित किशोर गट मुले भव्य कबड्डी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री सुरेश आचरेकर क्रीडांगण तेलेगल्ली, चिंचपोकळी मुंबई येथे दिनांक १९ व २० जानेवारी या कालावधीत सकाळ व संध्याकाळ अश्या दोन सत्रात स्पर्धा होणार आहे. स्पर्धेत एकूण २० संघांनी सहभाग घेतला असून सर्व सामने बादपध्दतीने खेळवण्यात येणार आहेत.
यास्पर्धेत मुंबई शहर मधील नामवंत किशोर गटाचे संघ खेळणार आहेत. जय दत्तगुरु कबड्डी संघ दादर, विरबजरंग कबड्डी संघ, अशोक क्रीडा मंडळ, वारसलेन क्रीडा मंडळ, सुनील स्पोर्ट्स, शिवमुद्रा क्रीडा मंडळ, बालविर क्रीडा मंडळ आदी संघ यास्पर्धेत सहभागी होणार आहेत. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंसाठी वयोमर्यादा १६ वर्षाखालील असेल तर वजन ५५ किलो खालील असेल.