श्रीलंकेचा विश्वविजेता कर्णधार अर्जुन रणतुंगाने भारतात झालेल्या २०११ आयसीसी विश्वचषक अंतिम सामन्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. हा अंतिम सामना भारतीय संघाने जिंकला होता.
अर्जुन रंगतुंगाने हे भाष्य त्या वेळी केलं जेव्हा त्याला संगकाराने केलेल्या पाकिस्तान दौऱ्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल विचारण्यात आलं. २००९ साली पाकिस्तानात श्रीलंकेच्या संघावर हल्ला झाला होता. त्यामुळे हा दौरा कुणाच्या सल्ल्याने आखला गेला होता, अशी मागणी कुमार संगकाराने केली होती.
त्यावर प्रत्युत्तर देताना २०११ च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्याची चौकशी करण्याची मागणी रणतुंगाने केलीय. ५३ वर्षीय रणतुंगाने फेसबुक पेजवर सिंहली भाषेत विडिओ पोस्ट केला आहे. त्यात रणतुंगाला खरा प्रश्न आहे तो श्रीलंकेच्या ६ विकेट्सने झालेल्या पराभवावर. रणतुंगा म्हणतो, ” मी तेव्हा भारतात समालोचन करत होतो. भारत जिंकला तेव्हा मला दुःख झाले आणि या श्रीलंकेच्या पराभवात शंकाही आली. ”
“मी याबद्दल सर्व खुलासे आता करू इच्छित नाही. परंतु मी यावर एकदिवस नक्की भाष्य करणार. याची चौकशी व्हायला पाहिजे. ” १९९६ च्या विश्वविजेत्या संघाचा हा कर्णधार पुढे असं म्हणतो.