---Advertisement---

…म्हणून रणजी सामन्याला झाला उशीर

---Advertisement---

आतापर्यंत क्रिकेटमध्ये विविध कारणांमुळे सामन्यांच्या वेळेत बदल करण्यात आले आहेत. भारतात सध्या देशांतर्गत रणजी ट्राॅफी (Ranji Trophy) स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील सामन्यांना सूर्यग्रहणामुळे (Solar-Eclipse) उशीर झाला आहे.

रणजी ट्राॅफीतील राज्यसंघांनी मान्य केले आहे की, या ट्राॅफीतील 25 डिसेंबरपासून सुरु झालेल्या बऱ्याच सामन्याचा दुसऱ्या दिवसाचा खेळ गुरुवारी (26 डिसेंबर) 9.30 वाजता सुरू होण्याऐवजी उशीरा (Delay Matches) सुरू झाला होता.

सूर्यग्रहण हे दक्षिण भारतातील काही भागांमध्ये दिसेल. यामुळे रणजी स्पर्धेत केवळ 75 षटके टाकण्यात येतील.

या स्पर्धेतील तामिळनाडू आणि मध्यप्रदेश यांच्यातील सामना सकाळी 11.30 वाजता सुरु झाला. यांच्यातील पहिले सत्र दुपारी 1 वाजेपर्यंत सुरू होते. त्यानंतर पुढचे सत्र 1.40 ते 3.10 पर्यंत  आणि 3.30 ते संध्याकाळी 5.30 पर्यंत सुरू होते.

कर्नाटक आणि हिमाचल प्रदेश या संघांमध्ये म्हैसूर सामन्यासाठी सकाळचे सत्र 11.15 ते 12.00, दुपारच्या जेवणानंतरचे सत्र- 12.40 ते 3.10 वाजता. तर, चहाची वेळ 3.30 ते 5.30 वाजेपर्यंत होती.

सूर्यग्रहणामुळे क्रिकेट सामन्यांना उशीर होणे ही पहिला घटना नसून याआधी, 40 वर्षांपूर्वी मुंबईत एका कसोटी सामन्याला असाच उशीर झाला होता.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---