रणजी ट्रॉफी 2024च्या अंतिम सामन्यात मुंबई संघाने स्थान पक्के केले. उपांत्य सामन्यात मुंबईकडून तामिळनाडू संघाला मोठा पराभव स्वीकारावा लागला. एक डाव आणि 70 धावांनी साई किशोर याच्या नेतृत्वातील तामिळनाडू संघ मुंबईच्या बीकेसी स्टेडियमवर पराभूत झाला. पराभवानंतर तामिळाडूचे मुख्य प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांनी कर्णधार साई किशोर याला जबाबदार ठरवले. पण आता भारतीय संघाचा दिग्गज दिनेश कार्तिक यानेच कुलकर्णी यांच्यावर निशाणा साधला आहे.
रणजी ट्रॉफी 2024 (Ranji Trophy 2024) चा दुसरा उपांत्य सामना मुंबई आणि तामिळनाडू संघात शनिवारी (2 मार्च) आमने सामने आसेल. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी (4 मार्च) मुंबईने मोठ्या फरकाने बाजी मारली. मुंबई संघ यावेळी रणझी ट्रॉफीचा 48वा अंतिम सामना खेळेल. उपांत्य सामन्यात तामिळनाडूने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, तिथेच चूक झाली, असे सुलक्षण कुलकर्णी यांना वाटते. तामिळनाडूच्या मुख्य प्रशिक्षकांच्या मते संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी घेतली पाहिजे होती. पण कर्णधार साई किशोर याचा विचार वेगळा होता.
असे असले तरी, दिनेश कार्तिक याच्या मते प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांनी अडचणीच्या वेळी संघाची साथ दिली. त्यांचे विधान हे खूपच निराश करणार आहे. कार्तिकने सोशल मीडियावर अशी पोस्ट केली आहे की, “बे खूप चुकीचे आहे. प्रशिक्षकांनी खूपच निराश करणारे वक्तव्य केले आहे. त्यांनी या काळात कर्णधाराला पाठिंबा दिला पाहिजे. याच कर्णधाराने संघाला सात वर्षांनंतर उपांत्य सामन्यापर्यंत आणले होते. प्रशिक्षकांनी असा विचार केला पाहिजे की, ही चांगल्या गोष्टीची सुरुवात आहे. त्यांनी आपला कर्णधार आणि संघाला बसखाली ढकलले आहे.”
दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर प्रथम फलंदाजी करताना तामिळनाडू संघ 146 धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात पहिल्या डावात मुंबईची धावसंख्या 106 असताना 7 खेळाडूंनी विकेट्स गमावल्या होत्या. मात्र, शार्दुल ठाकूर याने शतक केली आणि संघाची धावसंख्या पहिल्या डावाअंती 378 पर्यंत पोहोचली. 232 धावांनी मागे असणारा तामिळनाडूला हे लीड दुसऱ्या डावात मोडून काढता आले नाही. दुसऱ्या डावात तामिळनाडूने 51.1 षटकात 162 धावा केल्या आणि सर्व विकेट्स गमावल्या. (Ranji Trophy 2024 । Dines Karthik targeted Tamil Nadu head coach Sulakshan Kulkarni)
महत्वाच्या बातम्या –
IPL 2024 : सनराईजर्स हैदराबादचा मोठा निर्णय! ‘या’ दिग्गज खेळाडूला दिली मोठी जबाबदारी
Ranji Trophy : श्रेयस अय्यरची पुनरागमन सामन्यात निराशा, इतक्या धावा करून झाला आऊट