---Advertisement---

शिखर धवनचे शानदार पुनरागमन; रणजी ट्रॉफीमध्ये या संघाविरूद्ध ठोकले शतक…

On: गुरूवार, डिसेंबर 26, 2019 6:00 PM
---Advertisement---

दुखापतीनंतर भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनने शानदार पुनरागमन करत रणजी ट्रॉफीमध्ये शतक झळकावले. दिल्लीकडून फलंदाजी करताना धवनने नाबाद 140 धावा फटकावल्या. धवनच्या शानदार खेळीच्या जोरावर दिल्लीने हैदराबादविरूद्ध पहिल्या डावात 284 धावा केल्या.

या सामन्यात शिखर धवनचा अनुभव खूपच कामी आला कारण हैदराबादच्या भेदक गोलंदाजी समोर दिल्लीच्या विकेट्स ठरावीक अंतराने पडत राहिल्या. पण दुसऱ्या बाजूने शिखर धवन आपल्या उत्कृष्ट फलंदाजीने संघासाठी धावा जोडत होता. धवनने अनुज रावतच्या साथीने पाचव्या विकेटसाठी 84 धावांची भागीदारी केली.  

धवनने पहिल्या डावात 207 चेंडूत ही नाबाद 140 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 19 चौकार आणि 2 षटकार मारले. मात्र त्याच्या व्यतिरिक्त दिल्लीच्या अन्य कोणत्याही फलंदाजाला अर्धशतकही करता आले नाही.

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी दरम्यान धवनच्या गुडघ्याला दुखापत झाली होती, त्यामुळे तो वेस्ट इंडिजविरुद्ध टी20 आणि वनडे  मालिका खेळू शकला नाही. श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी आता धवनची भारतीय संघात निवड झाली आहे.

ही मालिका 5 जानेवारीपासून खेळली जाईल. या मालिकेसाठी रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली आहे, त्यामुळे सलामीवीर म्हणूल शिखर धवन आणि के एल राहुल भारताकडून डावला सुरूवात करतील.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---