---Advertisement---

मुंबई संघावर भडकला विनोद कांबळी, म्हणाला…

On: रविवार, डिसेंबर 29, 2019 10:48 AM
---Advertisement---

रणजी ट्रॉफीच्या तिसर्‍या फेरीत वानखेडे स्टेडियमवर मुंबईला रेल्वेविरुद्ध 10 गडी राखून पराभव पत्करावा लागला. त्यातच श्रेयस अय्यर, शिवम दुबे हे मुंबईचे खेळाडू या सामन्यात खेळले नसल्याने त्यांच्यावर तसेच मुंबई संघावर भारताचा माजी सलामीवीर विनोद कांबळीने ट्वीट करून टीका केली आहे.

कांबळीने ट्विट केले की “मुंबई संघाने मस्त डब्बा घातला! मुंबई संघाने अत्यंत खराब कामगिरी केली. श्रेयस अय्यर आणि शिवम दुबे या सामन्यासाठी मुंबईचा भाग नसल्यामुळे मी निराश झालो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अजून पाच दिवस शिल्लक आहेत. जेव्हा शक्य असेल तेव्हा मला सर्वोत्कृष्ट संघाला खेळताना पाहायला आवडेल.”

 

मुंबईविरूद्ध पहिल्या डावामध्ये प्रदीप पुजारने 37 धावा देऊन 6 खेळाडू बाद केले. त्याच्या या शानदार कामगिरीच्या जोरावर मुंबईचा संघ केवळ 114 धावांवर सर्वबाद झाला.

रेल्वेकडून खेळताना पहिल्या डावात कर्ण शर्माने 112 धावांची शतकी खेळी खेळली. तर अरिंदम घोषने 72 धावाची शानदार खेळी खेळली, या मुळे रेल्वेने पहिल्या डावात 266 धावा केल्या आणि 152 धावांची आघाडी घेतली.

दुसर्‍या डावात मुंबईचा संघ 198 धावांवर बाद झाला. रेल्वेकडून हिमांशु सांगवानने चांगली कामगिरी करत 22 षटकात 60 धावा देऊन 5 विकेट्स घेतले. त्यानंतर रेल्वेने 47 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 10 गडी राखून सामना जिंकला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---