जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. याचा परिणाम क्रिकेटवरही झाल्याचा पाहायला मिळाला आहे. परिस्थितीत सुधारणा होत असताना क्रिकेट सामने बायो बबलच्या नियमांचे पालन करून आयोजित केले जात आहेत. परंतु तरीही खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. याचा परिणाम रणजी ट्रॉफी (Ranji trophy) स्पर्धेच्या आयोजनावर देखील पडला होता. गतवर्षी कोरोनामुळे ही स्पर्धा रद्द करण्यात आली होती. तर जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात ही स्पर्धा पुन्हा एकदा सुरू होणार होती. परंतु खेळाडूंना कोरोनाची लागण होऊ लागल्याने ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती. आता या स्पर्धेच्या आयोजनाबाबत बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे.
रणजी ट्रॉफी स्पर्धेत एकूण ३८ संघ सहभाग घेत असतात. ही स्पर्धा १३ जानेवारी पासून सुरू होणार होती. परंतु कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली होती. राज्य क्रिकेट असोसिएशनने आग्रह केल्यानंतर ही स्पर्धा बीसीसीआय (BCCI) पुन्हा एकदा सुरू करण्याच्या प्रयत्नात आहे.
बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमल (Arun Dhumal) यांनी बीसीसीआयची बैठक झाल्यानंतर दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “आम्ही रणजी ट्रॉफी आयोजित करण्याची शक्यता आहे का? याचा विचार करत आहोत. ही स्पर्धा पुढे ढकलली त्यावेळी प्रकरणं वाढत होती. परंतु आता रुग्ण कमी होताना दिसून येत आहेत. पुढच्या महिन्यात आम्ही लीग टप्पा आयोजित करू शकतो आणि उर्वरित स्पर्धा आयपीएलनंतर पूर्ण करू शकतो का? यावर आमची टीम काम करत आहे.
या बैठकीत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि सचिव जय शाह (Jay Shah) देखील होते. बीसीसीआय ज्या योजनेनुसार ही स्पर्धा भरवण्याचा विचारात आहे, त्या योजनेनुसार, स्पर्धेचा पहिला टप्पा फेब्रुवारी – मार्च म्हणजेच आयपीएलच्या आधी खेळवला जाईल. तर स्पर्धेचा दुसरा टप्पा आयपीएल स्पर्धा झाल्यानंतर जून – जुलैमध्ये खेळवला जाईल. यावेळी देशातील काही भागात मॉन्सूनचे आगमन झालेले असते. तर काही भागात उन्हाळा शेवटच्या टप्प्यात असतो.
महत्वाच्या बातम्या :
नवे पर्व! पहिल्यांदाच ‘किंग कोहली’ खेळणार ‘हिटमॅन’च्या नेतृत्त्वाखाली; वर्षभरानंतर दिसणार ‘साथ-साथ’
अफगाणिस्तानने रचला इतिहास! थरारक सामन्यात श्रीलंकेवर मात करत केला अंडर-१९ विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश
हे नक्की पाहा: