राशिद खानने आयर्लंड विरुद्धच्या चौथ्या टी-२० मध्ये अष्टपैलूू कामगिरी केली. त्याच्या जोरावर अफगाणिस्तानने हा सामना २७ धावांनी जिंकला आणि ५ सामन्यांच्या मालिकेत २-२ अशी बरोबरी केली. अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजीत ६ बाद १३२ धावा केल्या. प्रत्युत्तरात यजमान संघ १०५ धावा करून बाद झाला. या सामन्यात राशिद खानने ३१०च्या स्ट्राईक रेटने १० चेंडूत ३१ धावा करून नाबाद राहिला. या डावात त्याने एक चौकार आणि तीन षटकार लगावले.
राशिद खानला मालिकेतील पहिल्या ३ सामन्यात एकही विकेट घेता आली नाही. या सामन्यात मात्र त्याने ३ षटकात २१ धावा देत २ बळी घेतले. त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. पण त्याने तो डावखुरा वेगवान गोलंदाज फरीद अहमदला दिला. फरीदने २ षटकात १४ धावा देत ३ बळी घेतले.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
भारताच्या ‘या’ अष्टपैलूची कारकिर्द धोक्यात, पुन्हा दुखापतीमुळे झिम्बाब्वे दौऱ्यातून बाहेर?
मोईन अन् लिव्हिंगस्टोनचा धुमाकूळ! एकाच सामन्यात ठोकलेत ९ सिक्स