नुकतेच भारतीय संघासाठी पदार्पण केलेला सूर्यकुमार यादव आयपीएल २०२१ स्थगित झाल्यानंतर मुंबईमध्ये आपल्या घरी आहे. सूर्यकुमार आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याचप्रमाणे, तो सातत्याने सोशल मीडियावर देखील व्यस्त असलेला दिसतो. क्रिकेट अथवा इतर वैयक्तिक घटनांचे छायाचित्र अथवा व्हिडिओ तो सोशल मीडियावर पोस्ट करत राहतो. नुकतेच सूर्यकुमार व त्याची पत्नी देविशा यांनी आपली पाचवी ‘एंगेजमेंट ऍनिव्हर्सरी’ साजरी केली. याबाबत सूर्यकुमारने एक इंस्टाग्राम पोस्ट केली होती ज्याला अफगाणिस्तानचा प्रमुख फिरकीपटू राशिद खान याने एक गमतीदार रिप्लाय दिला आहे.
राशिदचा मजेदार रिप्लाय
सूर्यकुमार यादव व त्याची पत्नी देविशा यांनी ३० मे रोजी आपली पाचवी एंगेजमेंट अनिव्हर्सरी साजरी केली. या खास क्षणाची आठवण म्हणून सूर्यकुमारने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून देविशासोबतचे एक छायाचित्र पोस्ट केले होते. या छायाचित्राला कॅप्शन देताना त्याने लिहिले, ‘मी तिच्यावर माझ्या बिर्याणीपेक्षा जास्त प्रेम करतो आणि नेहमी करत राहील. देविशा, हॅप्पी एंगेजमेंट अनिव्हर्सरी, तुझ्यावर कायम प्रेम करेल.’ या पोस्टला चाहत्यांसह सूर्यकुमारच्या सहकारी क्रिकेटपटू मित्रांनी पसंती दिली. तसेच, शुभेच्छा देखील दिल्या.
https://www.instagram.com/p/CPc-Wd3rRCO/?utm_medium=copy_link
अफगाणिस्तानचा अव्वल फिरकीपटू राशिद खान याने शुभेच्छा देताना रिप्लायमध्ये सूर्यकुमारला एक मजेदार प्रश्न विचारला. त्याने लिहीले, ‘हॅपी ऍनिव्हर्सरी भाई, तुमच्या बॅटिंगपेक्षा जास्त का?’ राशिदला म्हणायचे होते की, तू तुझ्या बॅटिंगपेक्षा देविशावर प्रेम करतो का?
अशी होती लव स्टोरी
सूर्यकुमार आणि देविशा यांची पहिली भेट २०१२ मध्ये मुंबईतील प्रसिद्ध पोद्दार कॉलेज येथे झालेली. त्यावेळी सूर्यकुमार २२ तर, देविशा १९ वर्षांची होती. देविशा ही अप्रतिम नृत्य करायची, जे सूर्यकुमार याला आवडायचे. चार वर्ष एकमेकांना समजून घेतल्यानंतर दोघांनी २०१६ मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. देशांतर्गत क्रिकेट व आयपीएल गाजवल्यानंतर नुकतेच सूर्यकुमारने यावर्षी मार्च महिन्यात इंग्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. पुढील महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघात त्याची निवड होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
लॉर्डस कसोटीत इंग्लंडने परिधान केली काळी जर्सी, कारण वाचून तुम्हीही कराल कौतुक
आयसीसीची नवी क्रमवारी जाहीर; विराट-रोहित या स्थानावर, तर सांघिक क्रमवारीत भारत
कमनशिबी आरसीबी! या पाच खेळाडूंना रिलीज करताच पुढच्या वर्षी त्यांनी जिंकली आयपीएल ट्रॉफी