ऑस्ट्रेलियामध्ये खेळल्या जाणारी बिग बॅश लीग डिसेंबर महिन्यात सुरू होणार आहे. राशिद खान याने आगामी बिग बॅश लीगमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, अफगाणिस्तानच्या माजी कर्णधाराने आता आपल्या निर्णयावरून यू टर्न घेतला आहे. मागच्या वर्षी ऑस्ट्रेलियन संघाने अफगाणिस्तानचा दौरा करण्यास स्पष्ट नकार दिला होता. मात्र, राशिद खान मात्र, बीबीलएच्या आगामी हंगामात खेळताना दिसू शकतो.
मागच्या वर्षी अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकार बनले. तालिबानने ज्या पद्धतीने देश आपल्या ताब्यात घेतला, ते पाहून जगभरात चर्चा सुरू होत्या. ऑस्ट्रेलियासह इतर कोणताच देश अफगाणिस्तान दौरा करण्याचे धाडस त्यावेळी दाखवत नव्हता. अशात ऑस्ट्रेलियन संघाने तिन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी अफगाणिस्तान संघाला स्पष्ट नकार दिला होता. याच पार्श्वभूमीवर राशिद खान (Rashid Khan) याने ऑस्ट्रेलियन संघावर नाराजी व्यक्त केली होती. राशिदच्या म्हणण्याप्रमाणे जर ऑस्ट्रेलियाला अफगाणिस्तानमध्ये खेळणाता अडचण असेल, तर बीबीएसमध्ये (BBL) मलाही मोकळेपणाने खेळता येणार नाही. त्यामुळे या स्पर्धेत आपल्या भविष्याबाबत तो गंभीरपणाने विचार करेल.
पण ऑस्ट्रेलियातील माध्यमांच्या माहितीनुसार 24 वर्षीय राशिद खान याचे नाव आगामी बीबीएल हंगामासाठी लिलावात असणार आहे. लिलावासाठी असलेल्या अधिकृत यादीत राशिदचे नाव असल्यामुळे याविषयी चांगल्या चर्चा सुरू आहेत. माध्यमांतील वृत्तांनुसार राशिदव्यतिरिक्त अफगाणिस्तानचे अजून तीन खेळाडू या यादीत सामील आहेत. यात मुजीब उर रहमान, नूर अहमद आणि इजहार उल हक नवीद यांची नावे आहेत.
बीबीएलचा आगामी हंगामात डिसेंबर महिन्यात 7 तारखेला सुरू होणार आहे. तसेच लीगचा अंतिम सामना 24 जानेवारी रोजी पार पडेल. आगामी वनडे विश्वचषक पुढच्या वर्षी भारतात पार पडणार आहे. विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर बीबीएलचा हा आगामी हंगाम महत्वाचा ठरू शकतो. (Rashid Khan has taken back his decision not to play in the Big Bash League)
महत्ताच्या बातम्या –
भारतीय कुस्ती महासंघाचे निलंबन! जागतिक कुस्ती महासंघाची मोठी कारवाई, कुस्तीपटूंसाठी चिंतेची बाब
FIDE Chess World Cup । भारताच्या युवा बुद्धिबळपटूचे स्वप्न तुटले, मॅग्नस कार्लसनकडून पराभव