---Advertisement---

“बंबईसे आया मेरा दोस्त…” राशिद खानची रोहित शर्मासाठी खास पोस्ट!

---Advertisement---

टी20 विश्वचषक 2024 मधील सुपर-8 च्या शेवटच्या सामन्यात टी20 सामन्यांचा थरार पहायला मिळाला. अटीतटीच्या या अफगाणिस्तान विरुद्ध बांग्लादेश सामन्यात राशिद खानच्या संघाने बाजी मारली. चुरशीच्या सामन्यात संघाने 8 धावांनी बांग्लादेश विरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या विजयानंतर अफगाणिस्तान यंदाच्या विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. यादरम्यान कर्णधार राशिद खानने इंस्टाग्रामवर फोटे पोस्ट केला आहे, या पोस्टची सगळीकडे चर्चा होत आहे.

बांग्लादेशविरुद्धच्या विजयानंतर अफगाणिस्तान विश्वचषक 2024 साठी सेमी फायनल मध्ये पात्र ठरणारा चाैथा संघ ठरला आहे. आता त्यांच्या सामना 27 जून रोजी दक्षिण आफ्रिका विरुद्ध होणार आहे.  तर सेमी फायनल-2 मध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात 27 जून रोजी रात्री 8 वाजता होणार आहे. आता यादरम्यान राशिद खानची इंस्टाग्रामवर पोस्ट व्हायरल होत आहे. ज्यामध्ये राशिद आपल्या सोबत रोहित शर्माचा फोटो शेअर केला आहे. आणि कॅप्शन मध्ये “बंबईसे आया मेरा दोस्त…आणि सेमीफायनलिस्ट” असा उल्लेख केला आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात भारताने कांगारुवर शानदार विजय मिळवला आणि यासह टीम इंडिया सेमी फायनलसाठी पात्र ठरली आहे. भारताने दिलेल्या 206 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ केवळ 181 धावाच काढू शकल्या. आणि या निर्णायक सामन्यात भारताने बाजी मारली. तर दुसरीकडे बांग्लादेश संघ केवळ 115 धावांचा पाठलाग करताना अफगणिस्तान संघाच्या भेदक गोलंदाजी समोर गुडघे टेकलायचे दिसुन आहे. बांग्लादेशने केवळ 105 धावा केल्या. डकवर्थ लुईस नियमाने अफगणिस्तान हा सामना 8 धावाने जिंकला.

महत्तवाच्या बातम्या-

दुखापतीमुळे गेला लंगडत, सामना जिंकताच आला धावत! गुलबदीन नाईबचा व्हिडिओ व्हायरल
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज डेव्हिड वॉर्नरने घेतली आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती!
राशीद खाननं दिलेला शब्द सार्थ करुन दाखवलं, दिग्गज क्रिकेटपटूची भविष्यवाणी ठरली खरी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---