---Advertisement---

अफगाणिस्तानचा विश्वचषक जिंकण्याचा स्वप्नभंग! लागोपाठ दुसऱ्या पराभवानंतर कर्णधार राशिद म्हणाला, “आम्ही दुर्दैवी…”

On: बुधवार, फेब्रुवारी 11, 2026 6:03 PM
---Advertisement---

पुरूषांच्या टी२० विश्वचषकाच्या इतिहासातील आणखी एक रोमांचक सामना बुधवारी( ११ फेब्रुवारी) प्रेक्षकांना पाहायला मिळाला. आयसीसी टी२० विश्वचषक २०२६मध्ये १३वा सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात खेळला गेला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्याचा निकाल दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये लागला. यामध्ये अफगाणिस्तानच्या पराभवानंतर कर्णधार राशिद खानने वक्तव्य केले.

खेळाडूंचे कौतुक करताना आणि भावूक होत राशिद म्हणाला, “माझ्या मुलांनी मैदानावर आज उल्लेखनीय कामगिरी केली. दक्षिण आफ्रिकेला १९०च्या आत रोकणे हे एक मोठे आव्हान होते.” अफगाणिस्तानने दक्षिण आफ्रिकेने २० षटकात १८७ धावसंख्येवर रोकले होते. त्यांना शेवटच्या १० षटकात कमी धावा होण्यापासून थांबावायची रणनीती होती, असेही राशिदने सांंगितले.

सामन्यानंतर राशिद भावूक झालेला दिसला. तो म्हणाला, “पराभव झालेल्या संघाचा भाग असणे खूप दुर्दैवी असते” राशिदच्या मते, त्याच्या संघातील खेळाडूंनी विजयासाठी चांगलेच प्रयत्न केले. सामन्याचा टर्निंग पॉइंट कोणता याबाबत बोलताना तो म्हणाला, “सामन्यात पॉवरप्लेच्या शेवटच्या काही षटकात विकेट्स लवकर पडल्याने आम्ही मागे पडलो. गुरबाजने ८४ धावा करत संघाला विजयाच्याजवळ नेले.”

सुपर ओव्हरच्या वेळेच्या स्थितीबाबत बोलताना राशिद म्हणाला, “शेवटच्या सुपर ओव्हरमध्ये एका चेंडूत ५ धावा शक्य होत्या. आम्ही मैदानावर आणखी चतुराईने खेळायला हवे होते. एक चेंडू किंवा एक डाईव्ह आणि सामन्याचा निकाल आमच्या पक्षात लागला असता.”

“येथे येण्यासाठी आम्ही दीड वर्ष चांगलीच मेहनत घेतली. यामुळे या पराभवानंतर आम्ही खूपच निराश आहोत. देशाचे प्रतिनिधित्व करणे गर्वाची बाब आहे. संघाचे मनोबल वाढवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार”, असेही राशिदने पुढे म्हटले आहे.

या स्पर्धेत अफगाणिस्तानचा हा दुसरा पराभव होता. याआधी त्यांनी न्यूझीलंडविरुद्धचा सामना गमावला आहे. यामुळे त्यांचे स्पर्धेतील स्थान संकटात आले आहे. या स्पर्धेत त्यांचे दोन सामने बाकी असून ते युएई आणि कॅनडाविरुद्ध आहेत.

अफगाणिस्तानने मागील अनेक आयसीसी स्पर्धांमध्ये मोठ्या संघांना टक्कर दिली आहे. त्यांनी पूर्ण सदस्य असलेल्या संघामध्ये केवळ दक्षिण आफ्रिका, भारत आणि इंग्लंडविरुद्ध सामने जिंकलेले नाहीत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---