अफगाणिस्थानचा फंरकीपटू राशिद खान नेहमी आपल्या करामतींसाठी चर्चेत असतो. यावेळी त्याने सरावादरम्यान मारलेल्या एका फटक्याची चर्चा सुरू आहे. याआधीही बऱ्याचवेळा सामन्यांदरम्यान त्याने हा शॉट मारल्याचे दिसले आहे. मात्र, आता तो आशिया चषकापूर्वी या शॉटची खास तयारी करत असलल्याचे दिसले आहे.
आशिया चषक २०२२ मधील श्रीलंकेविरुद्धच्या सलामीच्या सामन्यापूर्वी, राशिदने शनिवारी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये तो नेटमध्ये त्याचा ट्रेडमार्क ‘स्नेक’ मारताना दिसत आहे. अफगाणिस्तानचा सामना २७ ऑगस्ट रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर श्रीलंकेशी होणार आहे. अफगाणिस्तान आणि श्रीलंकेच्या ध्वजांच्या इमोजीसह त्याने लिहिले, “खेळाचा दिवस आला आहे आणि आम्ही त्यासाठी तयार आहे.”
Game day all set and ready to go ????????vs????????
#asiacup #dubai #afghanistan #gameday #snakeshot pic.twitter.com/RljJIwrhxo— Rashid Khan (@rashidkhan_19) August 27, 2022
अनुभवी मोहम्मद नबीच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान आशिया चषक टी-२० मध्ये उच्च श्रेणीतील संघांना पराभूत करण्याचा प्रयत्न करेल. रशीद हे त्यांचे ट्रम्प कार्ड असेल अशी अपेक्षा आहे. २३ वर्षीय राशिदने आयपीएलसह जागतिक टी-२० लीगमध्ये आपले नाव कमावले आहे, जिथे त्याने सर्वात अलीकडील हंगामात चॅम्पियन गुजरात टायटन्सचे प्रतिनिधित्व केले होते.
“मी याला स्नेक शॉट म्हणतो. जेव्हा एखादा साप एखाद्याला चावतो तेव्हा तो परत येतो. जेव्हा चेंडू खूप भरलेला असतो, तेव्हा मी शॉट पूर्ण करू शकत नाही. माझ्या शरीराची स्थिती मला शॉट पूर्ण करण्याची परवानगी देत नाही. मी प्रयत्न केल्यास असे करा, मी शक्ती निर्माण करू शकत नाही. म्हणून मी त्यावर खूप काम केले आहे आणि त्यासाठी माझे मनगट मजबूत केले आहे,”असे राशिदने गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला सांगितले होते.
दरम्यान, राशिदच्या या शॉटची चाहत्यांना चांगलीच भुरळल पडली असल्याचे दिसून आले आहे. त्याने शेअर केलेल्या व्हिडिोवर कमेंट्सचा पाऊस पडल्याचे दिसत आहे. अनेकांनी त्याला आणि त्याच्या संघाला आशिया चषकासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एशिया कपआधी धवनच्या श्रीलंकन पार्टनरची प्रतिज्ञा! म्हणाला, ‘आयपीएलसारखी करणार झटपट बॅटींग’
आफ्रिदी, वसीम बाहेर झाल्याने फिका पडला पाकिस्तानचा बॉलिंग अटॅक, भारतासाठी असेल ‘मौका मौका’!
तेंडुलकरांच्या घरी वाजणार सनई-चौघडे! सारा कधी करतेय लग्न? तिने स्वत:च सांगितलंय






