लहानपणी आपण मोठे झाल्यावर हे किंवा ते करु अशी प्रत्येकाची एक इच्छा असते. अशीच डॉक्टर होण्याची इच्छा अफगाणिस्तानचा अव्वल क्रमांकाचा गोलंदाज रशीद खानची होती.
याबद्दल त्याने ‘ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन’ या शोमध्ये सांगितले आहे. या शोमध्ये गौरव कपूर रशीदची मुलाखात घेत होता. यावेळी लहानपणीच्या आठवणी सांगताना रशीद खानने त्याला डॉक्टर व्हायची इच्छा होती हे सांगितले.
तो म्हणाला, “त्यावेळी बाहेरच्या वातावरणामुळे घराबाहेर जाण्यासाठी घरातले नकार देत होते आणि त्यावेळी माझे लक्षही अभ्यासावरच होते. आई म्हणायची की मी डॉक्टर बनायला हवे. कारण माझ्या कुटुंबात कोणीही डॉक्टर नव्हते.”
“मला नववी आणि दहावीमध्ये चांगले गुण मिळाले होते. मी पहिल्या पाच क्रमांकात होतो. त्यामुळे माझीही इच्छा होती डॉक्टर होण्याची. मला आभ्यास करायला आवडायचं. मला कोणतीही गोष्ट पटकन समाजायची.”
त्याने पुढे सांगितले की त्याने काही काळासाठी त्याने शिक्षकाचीही भूमिका पार पाडली आहे. हे सांगताना तो म्हणाला, “मी इंग्लिश शिकण्यासाठी काही कोर्सपण केले. माझी इच्छा होती की मी चांगले इंग्लिश शिकावे. मी जेव्हा तो कोर्स पूर्ण केला तेव्हा मी काही काळासाठी शिकवले देखील. साधारण 5-6 महिने मी शिकवले असेल.”
रशीद खान सध्या भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघाच चालू असलेल्या कसोटी सामन्यात खेळत आहे. रशीद आयसीसीच्या टी20 च्या गोलंदाजी क्रमवारीत अव्वल क्रमांकावर तर वनडे क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–एकमेव कसोटी सामन्यात कमी धावसंख्येवर अफगानिस्तानने भारताला रोखले
–मोहम्मद कैफचा सौम्या स्वामिनाथनला पाठींबा
–माझ्या शतकामागे रशिद खानचा हात- शिखर धवन