दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (south africa vs India) या दोन्ही संघांमध्ये पर्लच्या मैदानावर ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पार पडला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने (Temba bavuma) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला. कारण दक्षिण आफ्रिकेचे सलामीवीर फलंदाज स्वस्तात माघारी परतले होते. दरम्यान टेंबा बावुमाने (Temba bavuma and rassie van der dussen partnership) रासी वान डर दुसेनने डाव सावरला आणि महत्वपूर्ण भागीदारी केली. यासह या दोघांच्या नावे एका खास विक्रमाची नोंद झाली आहे.
टेंबा बावुमा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला त्यावेळी दक्षिण आफ्रिका संघ अडचणीत होता. टेंबा बावुमाने संयमी खेळी केली. त्याने १४३ चेंडूंचा सामना करत ८ चौकारांच्या साहाय्याने ११० धावांची खेळी केली. तर रासी वान डर दुसेनने १२९ धावांची खेळी केली. या दोघांमध्ये २०४ धावांची भागीदारी झाली. ही भारतीय संघाविरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये चौथ्या गडी साठी केलेली सर्वात मोठी भागीदारी आहे.
व्हिडिओ पाहा- सचिन-कांबळीच्या करामतीने गांगुलीच्या रुममध्ये झालेलं पाणीच पाणी
यापूर्वी असा कारनामा क्विंटन डी कॉक आणि एबी डिविलियर्स यांनी २०१३ मध्ये १७१ धावांची भागीदारी केली होती. तर गॅरी कर्स्टन आणि हॅनरी क्रोनिये यांनी १९९६ मध्ये १५४ धावांची भागीदारी केली होती.
वनडे क्रिकेटमध्ये भारतीय संघाविरुद्ध चौथ्या गडीसाठी सर्वात मोठी भागीदारी
२०४ धावा – टेंबा बावुमा आणि रासी वान डर दुसेन, २०२२*
१७१ धावा – क्विंटन डी कॉक – एबी डिविलियर्स , २०१३
१५४ धावा – गॅरी कर्स्टन आणि हॅनरी क्रोनिये, १९९६
तसेच भारतीय संघाविरुद्ध सर्वात मोठी भागीदारी करण्याचा विक्रम हर्शल गिब्स आणि गॅरी कर्स्टन यांच्या नावे आहे. दोघांनी २३५ धावांची भागीदारी केली होती. तर टेंबा बावुमा आणि रासी वान डर दुसेन यांनी केलेली भागीदारी ही दुसरी सर्वात मोठी भागीदारी आहे. तर हाशिम आमला आणि क्विंटन डी कॉक यांनी १९४ धावांची भागीदारी केली होती.
भारतीय संघाविरुद्ध सर्वात मोठी भागीदारी
२३५ धावा – हर्शल गिब्स आणि गॅरी कर्स्टन
२०४ धावा – टेंबा बावुमा आणि रासी वान डर दुसेन *
१९४ धावा – हाशिम आमला आणि क्विंटन डी कॉक
महत्वाच्या बातम्या :
भारताचा २६वा वनडे कर्णधार बनला केएल राहुल, पाहा आजवर झालेल्या वनडे कर्णधारांची संपू्र्ण यादी
अष्टपैलू कामगिरीने तगड्या संघांची ‘शाळा’ घेणारा बी.कॉम टॉपर, सीए, एमबीए असलेला ‘स्कॉलर’ अय्यर.
हे नक्की पाहा :