धुळे चोला वीरांस व रत्नागिरी अरावली ॲरोज यांच्यात आजची तिसरी लढत झाली. पाहिल्या पाच मिनिटांत 4-4 असा बरोबरीत सामना सुरू होता. दोन्ही संघांनी सावध पवित्रा घेत खेळाला सुरुवात केली. धुळे संघाकडून मितेश कदम ने जोरदार खेळ करत संघाला गुण मिळवून दिले. पण रत्नागिरी संघाने सांघिक खेळाचे प्रदर्शन दाखवत संघाला आघाडी मिळवून दिली.
मध्यंतरा पर्यत रत्नागिरी संघाकडे 17-14 अशी नाममात्र 3 गुणांची आघाडी होती. रत्नागिरी संघाकडून वेद पाटील, साईराज कुंभार यांनी चढाईत चांगला खेळ केला. रत्नागिरीच्या अमरसिंह कश्यप जबरदस्त पकडी करत संघाला आघाडी मिळवून दिली. सामन्याची शेवटची 10 मिनिटं शिल्लक असताना 28-18 अशी रत्नागिरी संघाकडे आघाडी होती.
रत्नागिरी अरावली ॲरोज संघाने 35-24 असा सामना जिंकत पहिला विजय मिळवला. साईराज कुंभार ने अष्टपैलू खेळ करत चढाईत 6 तर पकडीत 3 गुण मिळवले. तर वेद पाटील ने 8 गुण मिळवत त्याला चांगली साथ दिली. अमरसिंग कश्यप ने 7 पकडी केल्या. धुळ्या कडून मितेश कदम ने 5 गुण मिळवले.
बेस्ट रेडर- वेद पाटील, रत्नागिरी अरावली ॲरोज
बेस्ट डिफेडर्स- अमरसिंह कश्यप, रत्नागिरी अरावली ॲरोज
कबड्डी का कमाल- साईराज कुंभार, रत्नागिरी अरावली ॲरोज
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबई शहर मौर्य मेवरीक्स संघाची विजयी सलामी
के. एम. पी. युवा कबड्डी सिरीजच्या ‘अ’ गटातील 4 संघ प्रमोशन व प्ले-ऑफस साठी पात्र