‘ब’ गटातील तिसऱ्या दिवशी तिसरा सामना रत्नागिरी अरावली ॲरोज विरुद्ध परभणी पांचाला प्राईड यांच्यात झाला. दोन्ही संघानी सावध सुरुवात केली. पहिल्या 6 मिनिटात 4-4 असा सामना बरोबरीत सुरू होता. सामना अत्यंत चुरशीचा झाला.
रत्नागिरी कडून श्रेयस शिंदे व साहिल माने ने चतुरस्त्र चढाया करत सामन्यात रत्नागिरी संघाला मध्यंतरा पर्यत 17-13 अशी आघाडी मिळवून दिली. मध्यंतरा नंतर दोन्ही संघाची बचावफळी तगडा आव्हान चढाईपटू ना देत होती. शेवटची 11 मिनिटं शिल्लक असताना 21-21 असा सामना बरोबरीत सुरू होता. त्यानंतर परभणीच्या राहुल घांडगे ने सुपर रेड करत आघाडी मिळवून दिली.
दोन्ही संघ एकमेकांना चांगली टक्कर देत होते कधी रत्नागिरी तर कधी परभणी आघाडी मिळवत होती. अखेर रत्नागिरी संघाने 41-32 असा सामना जिंकला. रत्नागिरी कडून वेद पाटील ने चढाईत 5 तर पकडीत 4 गुण मिळवत अष्टपैलू खेळ करत विजयात मोलाची भूमिका निभावली. त्याला साईराज कुंभार ने सुपर टेन व भूषण गुढेकर ने 4 पकडी करत चांगली साथ दिली. परभणी संघाकडून प्रसाद रुद्राक्ष ने सुपर टेन पूर्ण करत तर पंकज राऊत ने 4 पकडी करत रत्नागिरी संघाला चांगली टक्कर दिली. (Ratnagiri Aravalli Arrows team stopped Parbhani team’s winning chariot)
बेस्ट रेडर- प्रसाद रुद्राक्ष, परभणी पांचाला प्राईड
बेस्ट डिफेंडर्स- पंकज राऊत, परभणी पांचाला प्राईड
कबड्डी का कमाल- वेद पाटील, रत्नागिरी अरावली ॲरोज
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबई वि. चेन्नई : धोनीने पहिली बाजी जिंकली, नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय, पाहा प्लेइंग इलेव्हन
नंदुरबार हिमालयन ताहर्स संघाने विजयाचा खात उघडला