महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग( एमपीएल 2023) स्पर्धेत सोमवारी क्वालिफायर एक सामना खेळण्यात आला. गहुंजे येथील एमसीए स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पावसाने मोठा व्यत्यय आणला. पावसामुळे प्रत्येकी 15 षटकांच्या केलेल्या या सामन्यातील दुसरा डाव मंगळवारी सकाळी खेळला गेला. रत्नागिरी संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 136 धावा केल्या होत्या. अखेरचा चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात रत्नागिरी संघाने चार धावांनी विजय मिळवत अंतिम फेरी धडक मारली.
गहुंजे येथे झालेल्या या सामन्याला सुरू होण्यास निर्धारित वेळेपेक्षा दीड तास उशीर झाला. कोल्हापूरचा कर्णधार केदार जाधव याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. रत्नागिरी संघाची सुरुवात झाली व त्यांचा सलामीवीर सोनवणे हा झटपट बाद झाला. कर्णधार काझी व प्रीतम पाटील हे देखील एकेरी धावसंख्येवर बाद झाले. धीरज फटांगरे व किरण चोरमले यांनी भागीदारी करून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. धीरजने 46 धावांची खेळी केली दहाव्या षटकानंतर पुन्हा पाऊस आल्याने खेळ थांबवण्यात आला. त्यानंतर हा सामना प्रत्येकी 15 षटकांचा केला गेला. कोल्हापूरचा इतर फलंदाजांना यानंतर धावांचा वेग न वाढवता आल्याने ते 136 पर्यंत पोहोचू शकले.
या धावांचा पाठलाग करताना कोल्हापूर संघाने सलामी वीर केदार जाधव व अंकित बावणे यांच्या योगदानामुळे 1.5 षटकात 18 अशी मजल मारलेली. मंगळवारी ही भागीदारी या दोघांनी 40 पर्यंत लांबवली. मात्र, अंकित दुर्दैवीरीत्या धावबाद झाला. त्यानंतर आलेला सिद्धार्थ म्हात्रे देखील फारशी चमक दाखवू शकला नाही. नौशाद शेख देखील धावबाद झाल्याने कोल्हापूर संघ संकटात सापडला. अशात केदारने 55 धावांची शानदार खेळी केली. अखेरच्या दोन शतकात कोल्हापूर संघाला विजयासाठी 25 धावांची गरज होती. मात्र, विजय पावले यांनी केदार व साहिल औताडे यांना बाद करत केवळ सहा धावा दिल्या. त्यानंतर अखेरच्या षटकात अनिकेत धुमाळने 19 धावांचा बचाव करत संघाला चार धावांनी विजय मिळवून दिला.
(Ratnagiri Jets Entered In MPL Final Beat Kolhapur Tuskers In Qualifier 1 Vijay Pawale Shines)
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! ‘या’ 12 शहरात खेळले जाणार वनडे विश्वचषक 2023चे सर्व सामने, एका क्लिकवर घ्या जाणून
केविन-युवराजमधील भांडणानंतर इंग्लंडच्या दिग्गजाने मारला होता अल्टी-पल्टी शॉट, वाचा तो रोमांचक किस्सा