पुणे – एलिमिनेटर 4 चा सामना क्वालिफायर 2 चा पराभूत रत्नागिरी संघ विरुद्ध एलिमिनेटर 2 चा विजयी नाशिक संघ यांच्यात झाला. रत्नागिरीच्या दुसऱ्या चढाईत अमरसिंग कश्यप ने चढाईत 2 गुण मिळवत रत्नागिरी संघाचे खात उघडला. तर नाशिकच्या प्रविण व्हडगर ने सुपर रेड करत संघाला 3-2 अशी आघाडी मिळवून दिली. नाशिक संघाने जोरदार खेळ करत रत्नागिरी संघाला ऑल आऊट करत 9-3 अशी आघाडी मिळवली. प्रविण व्हडकर ने चतुरस्त्र चढाया करत रत्नागिरीच्या बचावपटूंना बाद करत गुण मिळवले.
नाशिक कडून सिद्धांत संदनशिव ने उत्कृष्ट पकडी करत रत्नागिरीच्या चढाईपटूंना रोखले होते. मध्यंतरापूर्वी नाशिक संघाने पुन्हा एकदा रत्नागिरी संघाला ऑल आऊट करत 21-10 अशी आघाडी मिळवली. मध्यंतरा नंतर दोन्ही संघ सावध खेळ करत सुरुवात केली. 10 मिनिटांच्या खेळानंतर दोन्ही संघानी 5-5 गुण मिळवले, 26-15 अशी आघाडी नाशिक कडे होती. नाशिक संघाने आपली आघाडी कायम ठेवत सामन्यावर पकड मजबूत केली होती. 3 मिनिटं शिल्लक असताना नाशिक संघाकडे 10 गुणांची आघाडी होती.
रत्नागिरीच्या अमरसिंग कश्यप ने अखेरच्या क्षणी झटापट चढाया करत गुण मिळवत नाशिक संघाला ऑल आऊट करत पिछाडी कमी करत 28-31 अशी कमी करत सामन्यात चुरस आणली होती. शेवटच्या मिनिटाला एका चढाईत अमरसिंग ने 3 खेळाडूंना टच केले होते पण त्याला शशिकांत बरकांडने डॅश करत नाशिक संघाने आपला विजय निश्चित केला. रत्नागिरी कडून ईश्वर पथाडे ने अष्टपैलू खेळ करत 8 गुण मिळवले तर प्रविण व्हडगर ने 8 गुण मिळवले. सिद्धांत संदनशिव ने पकडीत 5 गुण मिळवले. तर रत्नागिरी कडून अमरसिंग कश्यप ने संघर्ष पूर्ण खेळी करत चढाईत 11 गुण मिळवले. तर निलेश शिंदे ने पकडीत 4 गुण मिळवले.
बेस्ट रेडर- अमरसिंग कश्यप, रत्नागिरी
बेस्ट डिफेंडर- सिद्धांत संदनशिव, नाशिक
कबड्डी का कमाल – शशिकांत बरकांड, नाशिक