पाचगणी, दि.4 ऑक्टोबर 2017- रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या रवाईन हॉटेल दिवाळी स्मॅश सुपर सिरीज् 16 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात आर्यन भाटिया याने मानांकित खेळाडूवर विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
रवाईन हॉटेल, पाचगणी येथील टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत मुलांच्या फेरीत सातव्या मानांकित आर्यन भाटियाने अव्वल मानांकित आदित्य बालसेकर ६-१, ३-६, ६-४ असा तीन सेटमध्ये पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली. दुसऱ्या मानांकित निखिल निरंजनने अर्जुन गोहडचा टायब्रेकमध्ये ६-२, ३-६, ७-६(३) असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. तिसऱ्या मानांकित सर्वेश बिरमानेने करीम खानचा ६-४, १-६, ६-४ असा संघर्षपूर्ण पराभव केला. चौथ्या मानांकित संस्कार चोभे याने पाचव्या मानांकित अर्जुन कुंडूचे आव्हान ६-३, ६-२ असे मोडीत काढले.
मुलींच्या गटात अव्वल मानांकित सान्या सिंग हिने आपली विजयी मालिका कायम ठेवत सहाव्या मानांकित रिया वाशीमकरचा ६-१, ७-५ असा पराभव केला. तिसऱ्या मानांकित हृदया शहाने वैष्णवी आडकरचा टायब्रेकमध्ये ६-२, ७-६(५) असा पराभव केला. दुसऱ्या मानांकित गार्गी पवारने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत कामया परबचा ६-४, ६-० असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्यपूर्व फेरी: मुले:
आर्यन भाटिया(७)वि.वि.आदित्य बालसेकर(१)६-१, ३-६, ६-४;
सर्वेश बिरमाने(३)वि.वि.करीम खान ६-४, १-६, ६-४;
संस्कार चोभे(४)वि.वि.अर्जुन कुंडू(५)६-३, ६-२;
निखिल निरंजन(२)वि.वि.अर्जुन गोहड ६-२, ३-६, ७-६(३);
मुली: सान्या सिंग(१)वि.वि.रिया वाशीमकर(६)६-१, ७-५;
श्रीचंद्रा टेंटू वि.वि.मृणाल कुरळेकर ६-२, ६-१;
हृदया शहा(३)वि.वि.वैष्णवी आडकर ६-२, ७-६(५);
गार्गी पवार(२)वि.वि.कामया परब ६-४, ६-०;
दुहेरी गट: मुले: दुसरी फेरी: सर्वेश बिरमाने/निरंजन निखिल(१)वि.वि.सन्मय गांधी/मानव जैन ६-१, ६-१;
हितेश पी./आर्य राज(४)वि.वि.आर्यन कुरेशी/प्रथम भुजबळ ७-६(५), ६-२;
अर्जुन कुंडू/संस्कार चोभे वि.वि.अमन फोगट/लेस्टन वाझ ६-०, ६-२;
अर्जुन गोहड/यशराज दळवी वि.वि.अथर्व आमरुळे/प्रसाद इंगळे ६-२, ६-४.