पुणे, दि.25 ऑगस्ट 2023- पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित नवव्या पीवायसी-ट्रूस्पेस करंडक बॅडमिंटन साखळी स्पर्धेत रेव्हन्स, हॉक्स यांच्यात क्वालिफायर १ लढत होणार आहे, तर ईगल्स व कॉमेंट्स यांच्यात एलिमिनेटर लढत होणार आहे.
पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या बॅडमिंटन कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत अखेरच्या साखळी फेरीच्या लढतीत सिद्धार्थ निवसरकर, सारंग आठवले, तेजस किंजवडेकर, आदित्य काळे, नेहा लागू, नीरज दांडेकर, मनीष शहा, नरेंद्र पटवर्धन, विश्वास मोकाशी, दत्ता देशपांडे, रुचा डावळीकर, यश शहा यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर स्वान्स संघाने फाल्कन्स संघाचा 6-2(295-269) असा पराभव केला.
चुरशीच्या लढतीत ईगल्स संघाने रेव्हन्स संघाला 4-4(266-252) असे बरोबरीत रोखले. ईगल्स संघाकडून सुधांशू मेडसीकर, अमित देवधर, चिन्मय चिरपुटकर, संजय परांडे, प्रशांत वैद्य, जयदीप कुंटे, नीलेश बजाज, जयकांत वैद्य यांनी सुरेख कामगिरी केली. अन्य लढतीत कॉमेट्स संघाने गोशॉक्स संघाचा 5-3(240-215) असा पराभव करून आगेकूच केली. विजयी संघाकडून प्रतीक धर्माधिकारी, पराग चोपडा, तन्मय चोभे, आदिती रोडे, संजय फेरवानी, हेमंत पालांडे, आनंदिता गोडबोले, सचिन जोशी,आनंद घाटे, विनित राठी यांनी अफलातून कामगिरी केली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
स्वान्स वि.वि.फाल्कन्स 6-2(295-269) (गोल्ड खुला दुहेरी 1: सिद्धार्थ निवसरकर/सारंग आठवले वि.वि.मिहीर आपटे/मकरंद चितळे 21-13, 21-12; गोल्ड खुला दुहेरी 2: तेजस किंजवडेकर/आदित्य काळे वि.वि.नितीन कोनकर/देवेंद्र चितळे 21-13, 21-15; खुला दुहेरी 3: अनिश रुईकर/अर्जुन खानविलकर पराभुत वि.योहान खिंवसरा/यश काळे 21-16, 14-21, 10-15; खुला दुहेरी 4: निशांत भनगे/अतुल ठोंबरे पराभुत वि.अभिजित राजवाडे/अमर श्रॉफ 08-21, 07-21; मिश्र दुहेरी 5: नेहा लागू/नीरज दांडेकर वि.वि.जितेंद्र केळकर/आरुषी पांडे 12-21, 21-18, 15-09; खुला दुहेरी 6: मनीष शहा/नरेंद्र पटवर्धन वि.वि.ऋषिका आपटे/अथर्व राजे 15-12, 13-15, 15-10; खुला दुहेरी 7: विश्वास मोकाशी/दत्ता देशपांडे वि.वि.आदित्य अभ्यंकर/हिमांशू थोरात 15-10, 15-13; खुला दुहेरी 8: रुचा डावळीकर/यश शहा वि.वि.यशोधन पानसे/अभिजीत गानू 15-09, 15-09);
ईगल्स बरोबरी वि.रेव्हन्स 4-4(266-252) (गोल्ड खुला दुहेरी 1: सिद्धार्थ साठ्ये/संग्राम पाटील पराभुत वि.तेजस चितळे/केदार नाडगोंडे 11-21, 14-21; गोल्ड खुला दुहेरी 2: सुधांशू मेडसीकर/अमित देवधर वि.वि.बिपीन चोभे/विनित रुकारी 21-10, 21-10; खुला दुहेरी 3: जयदीप गोखले/कर्ण मेहता पराभुत वि.अमोल मेहेंदळे/हर्षद जोगाईकर 21-20, 18-21, 15-11; खुला दुहेरी 4: बाळ कुलकर्णी/संदीप साठे पराभुत वि.अविनाश दोशी/कुणाल शहा 16-21, 14-21; मिश्र दुहेरी 5: यश मेहेंदळे/संध्या भट पराभुत वि.प्रांजली नाडगोंडे/रोहती भालेराव 14-21, 15-21; खुला दुहेरी 6: चिन्मय चिरपुटकर/संजय परांडे वि.वि.गिरीश मुजुमदार/मंदार विंझे 15-09, 15-07; खुला दुहेरी 7: प्रशांत वैद्य/जयदीप कुंटे वि.वि.तन्मय चितळे/देवेंद्र राठी 15-11, 15-09; खुला दुहेरी 8: नीलेश बजाज/जयकांत वैद्य वि.वि.मिहिर ठोंबरे/सुचित्रा जोशी 15-05, 15-09);
कॉमेट्स वि.वि. गोशॉक्स 5-3(240-215)(गोल्ड खुला दुहेरी 1: प्रतीक धर्माधिकारी/पराग चोपडा वि.वि.कल्याणी लिमये विंझे/तुषार नगरकर 21-06, 21-16; गोल्ड खुला दुहेरी 2: तन्मय चोभे/अदिती रोडे पुढे चाल वि.नैमिष पालेकर/बिपिन देव 21-00, 21-00; खुला दुहेरी 3: संजय फेरवानी/हेमंत पालांडे वि.वि. तुषार मेंगाळे/कपिल बाफना 21-14, 12-21,15-11; खुला दुहेरी 4: जयदीप वाकणकर/रमनलाल जैन पराभुत वि.विमल हंसराज/रोहित मेहेंदळे 00-21, 00-21; मिश्र दुहेरी 5: आनंदिता गोडबोले/सचिन जोशी वि.वि. समीर जालान/ईशा घैसास 21-16, 21-14; खुल्या दुहेरी 6: रोहित साठे/शिवकुमार जावडेकर पराभुत वि.अनिकेत सहस्रबुद्धे/विक्रम ओगले 07-15, 08-15; खुला दुहेरी 7: पार्थ केळकर/निखिल कानीटकर पराभुत वि. आशुतोष सोमण/रोहन पै 11-15, 10-15; खुली दुहेरी 8: आनंद घाटे/विनित राठी वि.वि.मिताली कुलकर्णी/गौरव पाटील 15-07, 15-08);
महत्वाच्या बातम्या –
अल्लू अर्जुनने राष्ट्रीय पुरस्कार जिंकताच वॉर्नरची मन जिंकणारी स्टोरी; शाबासकी देत म्हणाला…
नीरज चोप्राची ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये एन्ट्री, पॅरिस ऑलिम्पिकसाठीही पात्र