---Advertisement---

धोनीच्या अनुपस्थितीत कशी असेल चेन्नई सुपर किंग्जची प्लेइंग इलेवन? अश्विनची पोस्ट व्हायरल

On: शनिवार, मार्च 28, 2026 3:06 PM
---Advertisement---

आयपीएल २०२६ च्या हंगामाच्या पहिल्या दोन आठवड्यातून दिग्गज विकेटकीपर-फलंदाज एमएस धोनी संघाबाहेर झाला आहे. त्यामुळे त्याच्या अनुपस्थितीत चेन्नई सुपर किंग्जची (सीएसके) प्लेईंग इलेवन कशी असेल, याबाबत भारताचा माजी ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विन याने सांगितले आहे. त्याने इम्पॅक्ट प्लेयरसह संघ निवडला आहे, त्याने कोणाला कोणत्या स्थानी संधी दिली हे जाणून घेऊ.

आयपीएलच्या या १९ व्या हंगामात सीएसकेसाठी कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि संजू सॅमसन सलामीला येणार, हे निश्चित आहे. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी अश्विनने उर्विल पटेलला पसंती दर्शवली आहे. चौथ्या क्रमांकावर डेवाल्ड ब्रेविस, पाचव्या क्रमांकावर अष्टपैलू दुबेला घेतले आहे.

अश्विनने सहाव्या क्रमांकाच्या फलंदाजीसाठी दोन पर्याय दिले आहेत. त्याने सरफराज खान आणि १९ वर्षाखालील भारताचा कर्णधार आयुष म्हात्रे याला निवडले आहेत. तसेच प्रशांत वीरला वगळून कार्तिक शर्मा याला सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी निवडले आहे. वेगवान गोलंदाजीसाठी मॅट हेन्री आणि खलील अहमदला संधी दिली आहे.

अश्विनने त्याच्या सोशल मीडियाच्या पोस्टमध्ये लिहिले, “असा असेल सीएसकेचा अंतिम अकराचा संघ ऋतुराज, सॅमसन, उर्विल, ब्रेविस, दुबे, सरफराज किंवा आयुष, कार्तिक शर्मा, अकिल, नूर, हेन्री, खलील, कंबोज किंवा घोष किंवा राहुल किंवा गोपाल.”

या हंगामात सीएसकेचा पहिला सामना ३० मार्चला राजस्थान रॉयल्सविरुद्ध आहे. हा सामना गुवाहाटीमध्ये खेळला जाणार आहे. त्यानंतर हंगामातील पहिला घरचा सामना ३ एप्रिलला पंजाब किंग्जविरुद्ध खेळणार आहे.

धोनी स्नायूंच्या दुखापतीमुळे पुनर्वसन प्रक्रियेतून जात आहे, त्यामुळे त्याच्या पूर्णपणे तंदुरूस्त होण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. सीएसकेने जाहीर केलेल्या अधिकृत अहवालानुसार, याच दुखापतीमुळे तो आयपीएल २०२६ च्या सुरूवातीच्या टप्प्याला मुकणार आहे. त्याच्या अनुपस्थितीत संजू विकेटकीपर असणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---