---Advertisement---

विकेट घेतल्यानंतर सेलिब्रेशन वेळी बिश्नोईला का आठवला शाहरुख खान? रिंकूशी झालेल्या चर्चेत केला खुलासा

On: मंगळवार, ऑगस्ट 22, 2023 2:22 PM
Rinku Singh and Ravi Bishnoi
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघ सध्या आयर्लंडच्या दौऱ्यावर आहे. भारतीय संघ आयर्लंडविरुद्ध तिन टी20 मान्याची मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने भारताने आपल्या नावावर करत मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे. या मालिकेदरम्यान रिंकू सिंग या युवा खेळाडूने आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये पदार्पण केले. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात रिंकूला फलंदाजीची संधी मिळाली. यात रिंकूने आपली फलंदाजीची उत्कृष्ट शैली दाखवली. सोबतच भारतीय संघाचा फरकिपटू रवि बिश्नोई हा देखिल या मालिकेत चांगलो प्रदर्शन करत आहे. सामन्यानंतर या दोघांनी बीसीसीआय सोबत संवाद साधला.

आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या डावात रिंकू सिंग (Rinku Singh) सामनावीर ठरला. त्याने 21 चेंडूत 2 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 38 धावा केल्या. रिंकूसोबतच्या संवादात रवि बिश्नोई (Ravi Bishnoi) याने विकेट सेलिब्रेशनमध्ये शाहरुख खानची आठवण का आली हे सांगितले. बीसीसीआयने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये रिंकू सिंग आणि रवी बिश्नोई बोलत आहेत.

“आतंरराष्ट्रीय पदार्पणातच सामनाविर पुरस्कार मिळला कसे वाटत आहे तुला?” बिश्नोईच्या या प्रश्नाचे उत्तर देताना रिंकू म्हणतो की, “बरे वाटते. पहिल्या सामन्यात फलंदाजीसाठी मी उत्साहित होतो पण संधी मिळाली नाही. आज जेव्हा मी फलंदाजीला गेलो तेव्हा मी शांत आणि जलद खेळण्याचा विचार करत होतो जे मी आयपीएलमध्ये केले आहे. मी स्वतःला शांत ठेवण्यावर लक्ष केंद्रित करत होतो.”

यानंतर बिश्नोईने केलेल्या विकेटच्या जल्लोषाबद्दल बोलताना म्हणाला की, “खरं सांगायचं तर माझी स्वतःची जल्लोष साजरी करण्याची कोणतीही शैली नाही. म्हणून मी विचार केला की, विकेट मिळाल्याबद्दल हात पसरून देवाचे आभार का मानू नये. पुढच्या वेळी मी शाहरुख खानची नक्कल करण्याचा प्रयत्न करेन. असेही बिश्नोई म्हणाला.

बुमराह करतोय उत्कृष्ट नेतृत्व
आयर्लंडच्या दौऱ्यावर भारतीय संघाचे नेतृत्व संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह करत आहे. बुमराहने सुरवातीचे दोन्ही सामन्यात भारताला विजय मिळवून दिला आहे. सोबतच तो आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित करत आहे. या टी20 मालिकेचा शेवटचा सामना बुधवारी (23 ऑगस्ट) खेळवला जाणार आहे. (ravi bishnoi remember shah rukh khan on wicket celebration)

महत्वाच्या बातम्या-  
आशिया चषकासह विश्वचषकही जिंकणार पाकिस्तान संघ? कर्णधार बाबरकडून विरोधाकांना चेतावणी
विश्वचषकविजेत्या दिग्गजाने रोहित-आगरकरांना सुनावले, आशिया चषकाचा संघ निवडताना केली ‘ही’ मोठी चूक 

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---