---Advertisement---

रवी बिश्नोईने सांगितले पदार्पणाच्या सामन्यातील किस्से; म्हणाला..

On: बुधवार, मार्च 2, 2022 9:25 AM
bishnoi r
---Advertisement---

राजस्थानचा युवा लेगस्पिनर रवी बिश्नोई याने नुकतेच भारतीय संघासाठी पदार्पण केले आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध त्याने आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला. त्यानंतर त्याला श्रीलंकेविरुद्ध देखील एका सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतर आता तो आपल्या घरी पोहोचला आहे. त्याने आपल्या या अनुभवाबद्दल एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना गोष्टींचा खुलासा केला.

काय म्हणाला रवी?

एकोणीस वर्षाखालील मुलांचा विश्वचषक व त्यानंतर दोन वर्ष आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर रवी बिश्नोई याला भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली. वेस्ट इंडीजविरूद्ध तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत त्याने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. पहिल्याच सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केल्याने त्यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. आपल्या या अनुभवाबद्दल बोलताना रवी म्हणाला,

“भारतासाठी खेळणे हे स्वप्न असते. पहिल्या सामन्यात असे काही क्षण आले जे कायम लक्षात राहतील. युजी भैयाने (युजवेंद्र चहल) मला कॅप दिली तो क्षण त्यापैकी एक होता.”

“सामन्यात माझ्याकडून एक झेल सुटला. पूरनचा तो झेल महत्वाचा होता. मी अत्यंत निराश झालो होतो. मात्र तरीही सर्वांनी मला सांभाळून घेतले. मी गोलंदाजी करायला आल्यानंतर रोहित भैया, राहुल, युजी भैया यांनी माझा आत्मविश्वास वाढवला व मला खुलेपणाने गोलंदाजी करण्याचा सल्ला दिला.” सर्व अनुभवी खेळाडूंनी संपूर्ण सामन्यादरम्यान माझा आत्मविश्वास कमी होऊ दिला नाही, असेदेखील रवी पुढे बोलताना म्हणाला.

पहिल्‍याच सामन्‍यात ठरला सामनावीर

रवी पहिल्याच सामन्यात सामनावीर ठरला होता. त्याने अत्यंत कंजुस गोलंदाजी करत १७ धावांमध्ये दोन बळी मिळवले होते. त्याने भारतासाठी आत्तापर्यंत ४ सामने खेळताना चार बळी मिळविले आहेत. या दरम्यान त्याची इकॉनोमी सातपेक्षा कमी राहिली. रवी आगामी आयपीएलमध्ये लखनऊ सुपरजायंट्स संघाचा भाग असेल. आयपीएल लिलावापूर्वी लखनऊ संघाने त्याला ड्राफ्ट पद्धतीने आपल्या संघात सामील करून घेतले होते.

महत्वाच्या बातम्या-

पुजारा-राहणेला जुलैमध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटीतही मिळणार नाही स्थान? वाचा सविस्तर (mahasports.in)

महिला विश्वचषक ते आयपीएल २०२२, मार्च महिना क्रिकेटप्रेमींसाठी ठरणार आहे पर्वणी (mahasports.in)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---