हाँगकाँग सुपर सिक्स स्पर्धेत इंग्लंडच्या रवी बोपारानं रॉबिन उथप्पाच्या 6 चेंडूंवर 6 षटकार ठोकले. बोपारानं रॉबिन उथप्पाच्या षटकात 6 षटकारांसह 37 धावा केल्या. या षटकातील पहिल्या 5 चेंडूंवर रवी बोपारानं लागोपाठ षटकार ठोकले. यानंतर ओव्हरचा सहावा चेंडू वाईड गेला. मात्र शेवटच्या चेंडूवर त्यानं षटकार ठोकला.
या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार रवी बोपारानं 14 चेंडूत 50 धावांचा आकडा पार केला. त्यानं 14 चेंडूत 53 धावा केल्या. आपल्या या डावात त्याच्या बॅटमधून 8 षटकार निघाले. रवी बोपाराशिवाय समिट पटेलनं 18 चेंडूत 51 धावा केल्या. त्यानं आपल्या खेळीत 4 चौकार आणि 5 षटकार मारले.
रवी बोपाराचा 6 षटकार मारण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. बोपारानं रॉबिन उथप्पाच्या 6 चेंडूवर 6 षटकार मारून स्टुअर्ट ब्रॉडचा बदला घेतल्याचं सोशल मीडियावर चाहत्यांचं म्हणणे आहे. 2007 टी20 विश्वचषकात युवराज सिंगनं इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडच्या 6 चेंडूंवर 6 षटकार ठोकले होते.
या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, प्रथम फलंदाजीला आलेल्या इंग्लंडनं 6 षटकात 1 बाद 120 धावा केल्या. याला प्रत्युत्तर देताना भारतीय संघ 6 षटकांत 6 बाद 105 धावाच करू शकला. अशा प्रकारे भारताला 15 धावांनी पराभवाला सामोरं जावं लागलं. भारतासाठी भरत चिपलीनं 7 चेंडूत 21 धावा केल्या. श्रीवत्स गोस्वामीनं 10 चेंडूत 27 धावांचं योगदान दिलं. तर केदार जाधवनं 15 चेंडूत नाबाद 48 धावा केल्या. मात्र ते भारतीय संघाला विजयापर्यंत नेऊ शकले नाही.
भारत आतापर्यंत या स्पर्धेत विजयाशिवाय असून टीम इंडियाला पाकिस्तानशिवाय संयुक्त अरब अमिराती आणि इंग्लंडविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे.
हेही वाचा –
सरफराजच्या अपयशासाठी टीम मॅनेजमेंट कारणीभूत? युवा फलंदाजाच्या दुरवस्थेला कोण जबाबदार?
शुबमन गिलनं मोडला पुजाराचा मोठा रेकॉर्ड, रोहित-विराटच्या खास क्लबमध्ये एंट्री
रिषभ पंतचा मोठा धमाका, कसोटी क्रिकेटच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा जगातील पहिलाच खेळाडू!